
जबरीने सोनसाखळी व नगदी चोरणारा २४ तासाचे आत,हुडकेश्वर पोलिसांचे ताब्यात….
सोनसाखळी व नगदी यांची जबरी चोरी करणारा हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार अॅड. मिना महेन्द्रकुमार वर्मा, वय ६२ वर्षे, रा. प्लॉट. २४९/०८, जवाहर नगर, हुडकेश्वर, नागपुर यांनी पोलिस स्टेशन हुडकेश्वर येथे तक्रार दिली की ते नमुद पत्त्यावर आपले वडील महेन्द्रकुमार रामलालजी वर्मा, वय ८२ वर्ष यांचे सोबत राहत असुन ते वयोव्रुध्द असल्याने ते नेहमी व्हिलचेअरवर असतात दि १९. मार्च २०२५ चे ०५.त ६ वा चे चे दरम्यान फिर्यादी यांचे वडील हे घरी असतांना, एका अज्ञात चोरट्याने तक्रारदार यांचे वडीलांचे गळयातुन सोन्याचा गोफ लॉकेटसह व रोख ५,०००/- रू. असलेली पर्स असा एकुण १,८५,०००/- रू. चा मुद्देमाल जबरीने हिसकावुन पळुन गेला.


अशा तक्रारदार अॅड. मिना महेन्द्रकुमार वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०९ (४), ३२९ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे तपासात हुडकेश्वर पोलिसांनी परिसरातील एकुण ७० सि.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करून आरोपीस निष्पन्न करून, सापळा रचुन आरोपीस प्रशांत बार, मानेवाडा रोड येथुन ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव ओमप्रकाश दुमदेव निकोरे, वय २१ वर्ष, रा. प्लॉट नं. २३७,ओमनगर, सक्करदरा, नागपूर असे सांगीतले. आरोपीस विचारपूस केली असता, त्याने वर नमुद जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल किंमती अंदाजे १,८५,०००/- रू. चा जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त (दक्षिण प्रभाग) शिवाजीराव राठोड, पोलिस उपायुक्त(परीमंडळ ४) रश्मीता राव,सहा पोलिस आयुक्त(अजनी विभाग) नरेन्द्र हिवरे यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. ज्ञानेश्वर भेदोडकर, सपोनि. ओमप्रकाश भलावी, पोहवा. गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, चेतन वैद्य, दिनेश गाडेकर, नापोअं. विजय सिन्हा, पोअं. हिमांशू पाटील, कुणाल उके व मंगेश मडावी केली.



