
घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखा युनीट ५ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…
गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हेशाखा युनिट ५ ने छापा टाकुन मुद्देमालासह घेतले ताब्यात….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२६) रोजी गुन्हे शाखेचे पथक कळमणा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हेशाखा युनिट ५ पथकास गुप्त बातमीदारा तर्फे गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे कळमणा हद्दीत घर नं. १०४४, गल्ली नं. ४, मिनीमाता नगर, कळमणा, नागपूर येथे काही ईसम घरगुती वापराचे गॅस सिलेंडर चा काळा बाजार करताय अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरुन सदर ठिकाणी संध्याकाळी ५.२० ते ७.३० वा चे दरम्यान सापळा रचुन छापा टाकला असता


सदर ठिकाणी काही ईसम अवैधरित्या घरघूती वापराचे तसेच व्यवसायीक उपयोगाचे सिलेंडरचा साठा करून स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता सिलेंडर मधील गॅस मशीनच्या सहाय्याने दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरून त्याची विक्री करतांना साठवणुक करतांना मिळुन आले यावरुन तेथील ईसमास ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्याचे नाव प्रितपालसिंग उर्फ प्रित गुरूचरणसिंग बागल वय २८ वर्ष असे सांगितले सदर ईसम हा लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य करतांना समक्ष मिळुन आला.

आरोपीचे ताब्यातुन वेगवेगळया कंपनीचे घरघूती/व्यवसायीक लहान व मोठे असे एकुण ५९ सिलेंडर, गॅस रिफीलींग करण्याची मशीन, व चारचाकी टाटा एस वाहन क. एम.एच ३२ क्यू ४६९३, असा एकुण ३,११,५००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाणे कळमणा येथे आरोपींविरूध्द कलम २८५ भा.न्या.सं., सहकलम ३, ७ जीवन आवश्यक वस्तु कायदाअन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)राहुल माकणीकर,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)डॅा अभिजित पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट ५ चे पोलिस निरीक्षक राहुल शिरे, पोउपनि. राहुल रोटे, पोहवा. राजेन्द्र टाकळीकर, नापोशि अमोल भक्ते, पोशि विशाल नागभिडे, सुधिर तिवारी व आशिष पवार यांनी केली.


