
अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात…
अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एम.डी पावडर बाळगणाऱ्या आरोपींना अटक.केली दि.(८) चे रात्रीचे ००.१० वा. ते ०२.३० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे सक्करदरा हद्दीत, जुना बिडीपेठ, बुध्द विहारचे मागे, नागपूर येथे एका ज्युपीटर मोपेड वाहना वरील ईसम एम.डी पावडर बाळगुण आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीची शहानिशा करून सापळा रचुन छापा कारवाई केली असता.यातील ईसम आरोपी नामे १) ईकबाल शेख तय्यब शेख वय ४० वर्ष, रा. जुना बिडीपेठ, नागपूर हा मिळुन आला.


त्याचेवर यापुर्वी एन. डी. पी. एस कायद्यान्वये तिन गुन्हे दाखल असल्याने त्याचेवर दाट संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता. त्यांचे ताब्यातुन ५०.८१ ग्रॅम एम डी पावडर किंमती ५,०८,१०० /- रू. ची मिळुन आली.त्याचे ताब्यातुन एम. डी
पावडर, वजन करण्याचे साहित्य व ज्युपीटर मोपेड गाडी असा एकुण ५,७८,३००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची अधिक विचारपूस केली असता तो त्याचा साथिदार पाहिजे आरोपी नामे २) ईस्तीयाक खादीम रा. मोठा ताजबाग, नागपूर ३) वसीम उर्फ गुड्डू रा. मोठा ताजबाग, नागपूर यांचे मदतीने प्राप्त केल्याचे सांगीतले.यानुसार सदर तिन्ही आरोपी विरुध्द कलम ८ (क), २२(ब) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार पोलिस ठाणे
सक्करदरा येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाई कामी सक्करदरा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले

सदरची कार्यवाही. पोलिस आयुक्त नागपूर शहर डॅा रविंद्र सिघल,सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलिस
आयुक्त (गुन्हे) संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनि. गजानन गुल्हाने, सफौ. सिध्दार्थ पाटील, पोहवा. मनोज नेवारे, नितीन सांळुखे, पोअं. राहीत काळे, सुभाष गजभिये व मपोहवा. अनुप यादव यांनी केली.



