युनीट ३ ने अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन उघड केले ९ गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अट्टल घरफोड्यास युनीट ३ ने  ताब्यात घेऊन उघड केले ९ घरफोडीचे गुन्हे एकुन ३,९४,९८६ /- रू चा मुद्देमाल केला जप्त…

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(११) रोजी चे ३.०० वा. चे सुमारास पोलिस ठाणे अंबाझरी हद्दीत, प्लॉट नं. २४, हिलटॉप, नागपूर परीसरात  राजेश बोदले, यांचे घराचे बांधकाम सुरू असतांना कुणीतरी. अज्ञाताने त्यांचे घराचे दुसऱ्या माळयावरील एका रूम मधुन वेगवेगळया एमएमचे एकुण १४ वायर बंडल किंमती ८१,६०० /- रू चा मुद्देमाल चोरून नेला.यावरुन
फिर्यादी उमेश नामदेवराव डोंगरे वय ४२ वर्ष रा. प्लॉट नं. ४१, आदर्श नगर, वाडी, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे अंबाझरी येथे अज्ञात आरोपीविरूध्द  कलम ३८० भा. दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा  समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारा मार्फतीने मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, तसेच तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी, अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार योगेश उर्फ लक्की रमेश शाहु वय २५ वर्ष रा. काशीबाई देऊळ जवळ, कोतवाली, नागपूर यास सापळा रचुन ताब्यात घेऊन आरोपीस विचारपूस केली असता त्याने वर नमुद घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी केलेले वायर बंडल किंमती ६१,६०० /- रू चे, एक मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेले वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.







आरोपीची अधिक सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथिदार  आरोपी नामे शुभम उर्फ पांडया अरूण ठाकरे वय २५ वर्ष रा. यवतमाळ याचे मदतीने पोलिस ठाणे जरीपटका व कपिलनगर
हद्दीतुन अशाच प्रकारची एक घरफोडी कल्याची कबुली दिली. तसेच पोलिस ठाणे बजाजनगर हद्दीत एक व धंतोली हद्दीत पाहिजे आरोपी  चंदाबाई तुकाराम देवगडे रा. मटकीपूरा, ईमामवाडा, नागपूर व भारत नगर चौकातील कबाडी दुकानदार राकेश शाहु यांचेसह मिळुन घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीने त्याचा साथिदार पाहिजे आरोपी नामे अमोल तुकाराम देवगडे रा. मणिकपुरा हॉस्पीटल मागे, मटकीपूरा, ईमामवाडा, नागपूर याचे सोबत संगणमत करून पोलिस ठाणे बेलतरोडी हद्दीत एक व पोलिस ठाणे अजनी हद्दीत तिन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.आरोपी हा अट्टल गुन्हेगार असुन त्याचेवर नागपूर शहरात जवळपास ८० चे वर घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहे.गुन्हेशाखा युनिट  ३ यांनी आरोपी अटक करून एकुण ९ गुन्हे उघडकीस आणुन गुन्हयातील एकुण मुद्देमाल किंमती ३,९४,१८६/– रू चा जप्त केला आहे. आरोपीस पुढील तपासकामी मुद्देमालासह अंबाझरी पोलिसांचे ताब्यात दिले आहे. तसेच पाहीजे आरोपीचा शोध सुरू आहे.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नागपूर शहर डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोर्जे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील,पोलिस उपायुक्त(डिटेक्शन) निमीत गोयल सहा पोलीस आयुक्त डॅा अभिजित पाटील (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली युनीट ३ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुकूंद ठाकरे, पोउपनि नवनाथ देवकाते, सफौ. ईश्वर खोरडे, मिलींद चौधरी, पोहवा. मुकेश राउत, प्रविण लाडे, अमोल जासुद, अनुप तायवाडे, विनोद गायकवाड, नापोशि संतोष चौधरी पोशि. मनिष रामटेके व अनिल बोटरे यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!