व्यापाऱ्याची आर्थिक फसवणुक करणाऱ्या फरार आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने पुणे येथुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

व्यापाऱ्याला अधिक नफ्याचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातुन घेतले ताब्यात….

धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीस नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…







नागपूर (शहर प्रतिनिधी) – अधिक नफ्याचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने पुण्यातून उचलले आहे. या प्रकरणी फिर्यादी जयेश चंदाराणा, रा.हिंगणघाट, जि.वर्धा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेशपेठ, नागपूर शहर पोलिस ठाण्यात भा.दं.सं.कलम ८७/२०२३ कलम ४२०,४०६,१२०,(ब) ३४ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1) गणपतसिंग भीमसिंग राजपूत (वय 34 वर्षे), रा.रामनगर, ता.सुमेरपूर, जि.पाली राज्य-राजस्थान २) ललितसिंग लक्ष्मणसिंग राजपुरोहित, (वय ३२ वर्षे), ता.सुमेरपूर जि.पाली, राज्य-राजस्थान
3) अमन राधेश्याम भारती गिरी, (वय 29 वर्षे) अंदाजे मुंबई, अधिकृत पत्ता – अराजी कोदरी, पोस्ट सिंगारपूर, जि.गाझीपूर, उत्तर प्रदेश, ४) ताहा खान वल्द जलील अहमद उर्फ सुलतान रा.क्रॉफर्ड मार्केट मुंबई या आरोपींना आधीच अटक केली होती. मात्र या मधील फरार आरोपी – विलास उर्फ कैलाश गणपत नरवाडे, (वय ४० वर्षे), रा.नारायणवाडी, नारायण गाव, ता.जुन्नर, जि.पुणे या आरोपीला गुन्हे शाखेने पुण्यातून उचलले आहे.



गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, यातील आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादी नामे – जयेश चंदाराणा (वय ४९ वर्षे) यांना ट्रेड प्रॉफिट फंड (टीपीएफ) नावाचा फंड हया कंपनी मध्ये आपण जर नगदी २ करोड रूपये दिले तर आपणास ही कंपनी आर.टी.जी.एस. व्दारे ३.२० करोड रूपये आपले बँक खाते मध्ये टाकेल असे खोटे आश्वासन दिले. फिर्यादी यांना नगदी २ करोड रुपये जमा करायला लाऊन ते ठरलेप्रमाणे आरटीजीएस द्वारे फिर्यादीच्या खातेवर परत जमा न करता तेथील कार्यालयातील लोकांनी व मुंबई स्थित इसमांनी सदरचा व्यवहार जणु काही बनावट नसुन खराच आहे असे दर्शवुन सर्वांनी एक परीपुर्ण योजना आखुन संगणमताने फसवणुक केलेली आहे. त्यानुसार पोलिस ठाणे गणेशपेठ, नागपूर शहर अपराध क्र. ८७/२०२३ कलम ४२०,४०६,१२० (ब), ३४ भा.दं.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या पुर्वी ४ आरोपी अटक असुन त्यांचेकडुन अद्याप पावेतो एकुण रू.८० लक्ष चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे – विलास उर्फ कैलास गणपत नरवाडे, रा.नारायणवाडी नारायण गाव, ता.जुन्नर, जि.पुणे याचा ठावठिकाणाचा तांत्रीक तपास व गुप्त माहिती प्राप्त करून सपोनि. सागर आव्हाड, पोहवा.पंढरी, पोशि. रवि जाधव, व चालक पोहवा विजय ठोंबरे, आर्थिक गुन्हे शाखा, नागपुर शहर यांनी नारायणवाडी नारायण गाव, ता.जुन्नर, जि.पुणे येथे जावुन शोध घेतला असता सदर आरोपी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन आरोपीस नागपुर येथे घेवुन आले व अटक करून पोलिस कोठडी कामी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई पोलिस आयुक्त डॅा रविन्द्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोर्जे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील,पोलिस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सागर आव्हाड,पोहवा.पंढरी, पोशि. रवि जाधव, व चालक पोहवा विजय ठोंबरे, आर्थिक गुन्हे शाखा, नागपुर शहर यांनी आणि पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!