नदीच्या काठावरील जुगार अड्ड्यावर अरोली पोलिसांचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जुगार अड्डयावर अरोली पोलिसांनी छापा टाकुन,६ जुगारींना घेतले ताब्यात….

अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (३१) रोजी पोलिस स्टेशन अरोली येथील पथक पोलिस स्टेशन हद्दीत  पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोलिस स्टेशन हद्दीत कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत झाडी झुडपामध्ये काही लोक ५२ ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे.





अशा खात्रीशीर माहिती वरून कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत जुगार अड्डयावर रेड केली असता त्याठिकाणी आरोपी-१) सुधीर ढोलबा ठोबरे वय ३५ वर्ष, २) उमेश सुर्यभान कोटरूगे वय ४५ वर्ष ३) विष्णु कवडु मोहुरले वय ३५ वर्ष ४) प्रशांत रामु मांडाळे वय २९ वर्ष ५) भुमेश सुभाष मसराम वय २९ वर्ष वरील सर्व रा. कोदामेंढी ६) अनिल मोहन मोहने वय ४५ वर्ष, रा. वाघबोडी ७) फरार संदीप नंदलाल कुंभरे ८) फरार फिरोज पठाण ९) फरार दिनेश बावणकुळे तिन्ही रा. कोदामेंढी ता. मौदा हे हारजितचा जुगार खेळ खेळतांना मिळुन आल्याने आरोपींकडुन नगदी ३९०० /- रू. तसेच घटनास्थळावरील व पाच ५२ तास पत्ते प्रत्येकी किंमती
५०/- रू प्रमाणे २५० /- रू व एकुण ०५ मोटार सायकल किंमत २१५००० /- रू असा एकुण २१९१५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरूद्ध पोस्टे अरोली येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस
अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी,रामटेक रमेश बरकते यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन अरोली येथील ठाणेदार सपोनि निशांत फुलेकर, पोलिस उपनिरीक्षक
सुशिलकुमार सोनवणे, पोहवा संदीप बाजनघाटे, शाम पोकळे, पोशि राकेश राउत, विक्की कोथरे, मनीश सुखदेवे, चालक नितेश देवांगन तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक विभाग रामटेक कार्यालय स्टाफ नापोशि अनिल सपाटे, पोशि सचिन गेडाम यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!