
अवैध गोतस्करांवर भिवापुर पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही,गोतस्करांचे धाबे दणानले….
जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या विरूध्द नविन कायदा-भारतीय न्याय संहीता २०२३ मधील संघटीत गुन्हेगारी च्या कलमान्वये गुन्हा नोंद, ६ आरोपी अटकेत, भिवापुर पोलिसांची कारवाई,गोतस्करांचे धाबे दणानले….
भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सन उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सर्व प्रकारचे अवैध धंदे याचेवर कठोर कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी आदेशीत केले होते त्यानुसार पोलिस स्टेशन भिवापुरचे अधिकारी व कर्मचारी दि मार्च रोजी भिवापुर पोलिस स्टेशन हद्दीत रात्रगस्त करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, भिवापुर कडुन उमरेड च्या दिशेने बोलेरो पिकअप एम. एच. २७ बी.एक्स ६८४५ ही पाठीमागुन लाकडी पाटया लावुन संशयीत रित्या जात आहे.


मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे पोलिसांनी वाहन शोधण्या करीता पेट्रोलींग केली असता संशयीत बोलेरो पिकअप एम. एच. २७ बी.एक्स ६८४५ हे वाहन भिवापुर कडुन उमरेड च्या दिशेने भरधाव वेगाने जाताना दिसले. सदर वाहनाचा पाठलाग केला असता एक लाल रंगाची हुंडाई आय २० गाडी क एम. एच. ४३ ए. टी ४५११ ही पोलिस वाहनाच्या मागे पुढे असुन पोलिसांना बोलेरो पिकअप वाहनाला ओव्हर टेक करू देत नव्हती. तसेच त्यांना पळून जाण्यास मदत करत होते. पोलीसांनी बोलेरो पिकअप गाडीला ओव्हरटेक करून मरूपार गावाचे जवळ बोलेरो पिकअप एम. एच. २७ बी. एक्स ६८४५ हे वाहन थांबवले असता वाहन चालक व त्याचा साथीदार वाहन सोडुन पळुन गेले. वाहनाच्या पाट्या काढुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये १३ गोवंश जनावरे बाधुन निर्दयते कोंबुन, चारापाण्याची व्यवस्था न करता वाहतुक करतांना मिळुन आले.

शासकीय वाहनास अडथळा निर्माण करणारी हुंडाई आय २० गाडी क एम. एच. ४३ ए. टी ४५११ ही गाडी पोलिसांनी थांबवुन त्यातील चालक व त्याचा साथीदार यांना नाव पत्ता विचारले असता चालक आरोपी क्र. १) अजय धनराज चौधरी, वय २७ वर्ष रा. नागतरोली ता. भिवापुर व त्याचा साथीदार आरोपी क्र २) श्रीकांत यादवराव चौधरी वय २५ वर्ष रा. नागतरोली ता. भिवापुर अशी माहीती प्राप्त झाली. आरोपी क्र १) अजय धनराज चौधरी याला बोलेरो पिकअप एम. एच. २७ बी.एक्स ६८४५ च्या चालक त्याच्या साथीदार आणि वाहन मालकाचे नाव पत्ता विचारले असता बोलेरो पिकअप चालक आरोपी क्र ३). अक्षय राजु वाघमारे रा दिघोरा ता भिवापुर आणि त्याचा साथीदार आरोपी क्र ४). शुभम तुकाराम चौधरी, रा. दिघोरा ता भिवापुर, आणि बोलेरो पिकअप वाहन मालक आरोपी क्र ५) आदित्य मोरश्वर खापर्डे, रा शुकवारी वार्ड, पवनी, जि. भंडारा अशी माहीती प्राप्त झाली.

नमुद सर्व आरोपींनी संगणमत करून १३ गोवंश जनावरे बाधुन निर्दयते कोंबुन, चारापाण्याची व्यवस्था न करता वाहतुक करतांना मिळून आले. पोलिसांनी पंचासमक्ष एक बोलोरो पिकअप एम. एच. २७ बी.एक्स ६८४५ किंमती ४,५०,०००/- रूपये १३ गोवंश जनावरे किंमती १,७६,००० /- रूपये आणि हुंडाई आय २० गाडी क एम. एच. ४३ ए. टी ४५११ किंमती ६,००,००० /- रूपय एकुण किंमती १२,२६,०००/- रूपयाचा मुददेमाल जप्त केला तसेच नमुद आरोपी यांच्या विरूध्द कलम ११(१) (डी) (ई) (एफ) प्रा. छ. अधि, सहकलम ५(ए), ९ महा. प्राणी संरक्षण अधिनियम . सहकलम ११८ मपोका सहकलम १३४,१७७मोवाका, सकलम २२१.३२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलसांनी सदर गुन्हयात आरोपी १). अजय धनराज चौधरी, वय २७ वर्ष रा. नागतरोली ता. भिवापुर, २) श्रीकांत यादवराव चौधरी वय २५ वर्ष रा. नागतरोली ता. भिवापुर आणि ३). मोरश्वर खापर्डे, रा शुक्रवारी वार्ड, पवनी, जि. भंडारा यांना दि ३१ मार्च रोजी अटक केली व त्यांची सखोल विचारपुस करून त्यांच्या गुन्हे रेकॉर्डची पाहणी केली असता त्यांच्यावर गो तस्करी बाबत अनेक गुन्हे दाखल असल्याबाबत माहीती प्राप्त झाली. सदर गुन्हयात पोलिस अधिक्षक. हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात भिवापुर पोलिसांनी संगठीत गुन्हेगारी बाबत प्रस्ताव सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी,उमरेड वृष्टी जैन यांच्या कडे पाठवुन सदर गुन्हयात परवानगी प्राप्त करून सदर गुन्हयात भारतीय न्याय संहीता कलम ११२ (संघटीत गुन्हेगारी) अन्वये कलम वाढ करण्यात आले आहे. अटक आरोपींचा १ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आहे.तसेच आज दि ०१ एप्रिल रोजी आरोपी १). अक्षय राजु वाघमारे वय २८ वर्षे, रा दिघोरा ता. भिवापुर २). शुभम तुकाराम चौधरी, वय २६ वर्षे रा दिघोरा ता भिवापुर, ३). सचिन धनराज वैदय, वय ३३ वर्षे, रा आकोट, ता पवनी, जि भंडारा या ३ आरोपींना अटक करण्यात आली
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी,उमरेड वृष्टी जैन यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्चेशन भिवापुर सपोनि जयकुमार निर्मल,पोउपनि सुरेखा बिडगर,पोहवा आनंद धात्रक,किशोर डेकाटे,नापेशि रवी जाधव,पोशि प्रितम खोपे,दिपक ढोले,मनोज चाचेरे,निकेश आरीकर यांनी केली


