नाकाबंदी करुन गुटख्याची वाहतुक करणाऱ्यास घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधीत तबांखुची वाहतुक करतांना दोघे केळवद पोलिसांचे ताब्यात…

केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी नजीकच्या सीमेलगतच्या राज्यातुन  महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अशा सुंगधीत तंबाखुची तस्करी रोकण्यासाठी राज्यातील सीमेलगतच्या सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या





त्याअनुषंगाने दि(22) चे १०.३० वाजता चे दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद व त्यांच्या पोलिस पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना  खबरीद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन  मौजा –
सावळी फाटा छञापुर शिवार NH-47 वर नाकाबंदी करीत असताना मिळालेल्या माहिती प्रमाणे स्कॅार्पियो कार क्र एम.एच-13 डी.एच-1893 ही पांढुर्णा कडुन येताना दिसली त्यावरुन सदर स्कॅार्पियो कारला लाल लाईट चा थांबविण्याचा इशारा केला असता सदर कारच्या चालकाने आपली कार नाकाबंदीचे ठिकाणी
थांबविली



सदर कारची  पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तबांखु 1) मन 5 स्टार सुगंधीत तबांखु चे 500 ग्राम चे 30 पॉकेट प्रत्येकी 250/- रुपये प्रमाणे एकुन- 7,500/- रुपये, 2) 535 जनम सुगंधीत तबांखु चे 500 ग्राम चे 396 पॉकेट प्रत्येकी 250/- रुपये प्रमाणे एकुन-99,000/- रुपये, 3) पान
पराग प्रिमियम चे 96 ग्राम चे 45 पॉकेट ( त्यामध्ये 32 पाउच प्रत्येकी पाउच 4/- रु ) प्रत्येकी पॉकेट कि.- 120/- रुपये प्रमाणे एकुन-5,400/- रुपये, 4) रत्ना छाप तंबाखू नं 3000 चे 30 बॉक्स (त्यामध्ये 50 ग्राम चे 10 डब्बे प्रत्येकी डब्बा 118/- रुपये) प्रत्येकी बॉक्स किंमत-1180/- रुपये प्रमाणे एकुन – 35,400/- रुपये,
5)होला हुक्का शिशा तंम्बाखु चे 1 किलो ग्राम चे 20 पॉकेट प्रत्येकी-820/- रुपये प्रमाणे एकुन 16,400/- रुपये, 6) गोल्डन सफारी RP 999 तंम्बाखु चे 1 किलो ग्राम चे 33 पॉकेट प्रत्येकी-550/- रुपये प्रमाणे एकुन- 18,150/- रुपये, 7) ईगल हुक्का शिशा 400 ग्राम चे 50 पॉकेट प्रत्येकी 640/- रुपये प्रमाणे एकुन-32,000/- रुपये असा एकुन किंमती- 2, 25, 210 /- रुपये चा माल व स्कॅार्पियो कार क्र एम.एच-13 डी.एच-1893 किं. 10,00,000/-रुपये असा एकुण – 12,25,210 /- रु चा मुद्देमाल मिळुन आला



सदरचा मुद्देमाल जप्त करुन सदर  कार क्र एम.एच-13 डी. एच-1893 चा चालक सुमेध बंडु खरात वय-26 वर्ष रा-
म्हाडा कॉलनी, प्लॉट नं 5, बुट्टीबोरी तह- हिगणा जि- नागपुर असे सांगितले व कारमधील असलेल्या त्याच्या सहकारी इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- हर्षल अशोक पडोळे वय 33 वर्ष रा- जुन मंगळवारी, भांडेवाडी, नागपुर या दोन्ही आरोपींविरुध्द  कलम 188, 272, 273, 328 भादवी सहकलम अन्न
सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 26(2)(I), 26(2)(IV), 27(3)(c), 30(2) (a), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधि. 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष पोदार,अपर पोलिस अधिक्षक,रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि राकेश साखरकर ठाणेदार पो.स्टे केळवद पोहवा दिनेश काकडे पोशि धोंडुतात्या देवकत्ते  यांनी केली आहे.
,





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!