
विनापरवाना कन्हानच्या नदीच्या वाळुची तस्करी करुन शासनाचा महसुल बुडवुन वाळुची विक्री करणाऱ्याच्या नागपुर पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
कन्हान (नागपुर ग्रामीण) : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०४/१०/२०२३ रोजी कन्हान पोलिस स्टेशनचे पथक हे पोलिस अधिक्षक . हर्ष. ए.पोद्दार यांचे अवैध रेती वाहतुक थांबविण्याचे शुन्य सहनशीलता धोरण प्रमाणे संपुर्ण पो.स्टे. परिसरात कोणीही अवैध
रेतीची वाहतुक करणार नाही या हेतुने मिळालेल्या माहीती वरुन पो.स्टे. हद्दीतील मौजा टेकाडी शिवारातील NH-४४ जबलपुर ते नागपुर रोडवर लक्ष्मी लॉज से समोर दोन पंचांसह नाकाबंदी केली असता ट्रक क्र.
१) १६ चाकी नॅशनल परमिट ट्रक क्र. एम.एच-३२- ए. जे- ५९३१ व त्यामधील ९ ब्रास रेती,


२) १६ चाकी नॅशनल परमिट ट्रक क्र. एम. एच.-३२/ए.के–५९३२ व त्यामधील ९ ब्रास रेती, ३) १६ चाकी नॅशनल परमिट ट्रक क्र. एम. एच.- ३२ / ए. के–१७८६ व त्यामधील ९ ब्रास रेती,

३) १४ चाकी नॅशनल परमिट ट्रक क्र. एम. एच- ३२ / क्यु – ५९३१ व
त्यामधील ८ ब्रास रेती असे एकुण ३५ ब्रास रेती, ४ ट्रक सह एकुण १,१६,१०,००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. त्याच प्रमाणे चारही ट्रक चालक

. १) शरद रामेश्वर सिराम, वय ४१ वर्ष रा. सुकडी बाई ता. सेलु जिल्हा वर्धा,
२) शेख इरफान शेख बुरहान वय ४२ वर्ष रा. सालोड (हिरापुर) ता. जि. वर्धा,
३) राजेंद्र बाबुराव वांदिले वय ४१ वर्ष, रा. माहुरे लेआऊट वार्ड नं. २ बस स्टॉप चे मागे सेलु जिल्हा वर्धा,
४) अविनाश नत्थुजी मडावी वय ३१ वर्षे रा. खडकी तह. सेलु जिल्हा वर्धा यांचे तसेच ट्रक मालकांचे विरुद्ध पोस्टे कन्हान येथे कलम ३७९, १०९, ३४ भादंवी सह कलम ४८ (७) (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनीयम १९६६ कादयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही ही पोलिस अधिक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक भटकर यांचे मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, सहायक पोलिस निरीक्षक चेतनसिंह चौहाण, सहायक फौजदार गणेश पाल, सदाशिव काठे, पोलिस हवालदार मुदस्सर जमाल, हरीष सोनभद्रे, पोलिस नायक अमोल नागरे, महेंद्र जळितकर, अनिल यादव, पोलिस अंमलदार नविन पाटील, अश्विन
गजभिये, चालक पोलुस हवालदार अजय भगतव, होमगार्ड सैनिक हटवार यांनी केली.


