WCL मकरधोकडा येथील कंपनीतुन स्टील प्लेट चोरणार्यास LCB पथकाने केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

WCL मकरधोकडा येथील RVR कन्स्ट्रक्शन कंपनी मधुन लोखंडी प्लेटा चोरणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकूण १०९५०००/- रू. चे मुद्देमाल केला जप्त….

उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन उमरेड अंतर्गत मौजा हेवती शिवार येथे दिनांक १७/०१/२०२४ चे ८.०० वा. ते दि. १८/०१/२०२४ चे १०.०० वा. दरम्यान फिर्यादी मुकंद गणेशचंद्र सैयहीया यांचे उदासा परिसरात कन्वेयर बनविण्याकरीता लागणारे लोखंडी बेल्टस ३ बाय ५ फुटाच्या लांबी रूंदीच्या वजन प्रत्येकी ४५ किलोच्या ४५ नग
प्लेटा प्रत्येकी किंमती अंदाजे १०००/- रू. असा एकुण ४५०००/- रू मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरी करून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे उमरेड येथे अप क्र. १२/२४ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असतांना दि. १८/०१/२०२४ रोजी उमरेड उपविभागात खाजगी वाहनाने बाईक चोरी व मालमत्तेचे गुन्हयातील आरोपीचा शोध करीत असता गोपनीय बातमी व्दारे माहीती मिळाली की टाटा गाडी क्र. MH 31CQ 3751 या गाडी मध्ये WCL मकरधोकडा येथिल RVR कंस्ट्रक्शन कंपनीचे आवारातून चोरी गेलेल्या लोखंडी प्लेट उदासा येथून गायकवाड याचे कबाडी दुकानातून टाटा एस गाडीतून
गाडी क्र. MH 31 CQ 3751 मध्ये लोड करून नागपूरकडे येत आहे. अशी माहिती मिळाल्याने लगेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने चंपा टोल नाका येथे नाकाबंदी केली असता मिळालेल्या माहितीनुसार गाडी येतांना दिसल्याने गाडी थांबवून गाडीची तपासणी केली असता गाडी मध्ये पोस्टे उमरेड अप. क्र. १२/२४ कलम ३७९ भादंवि गुन्हयात चोरी गेलेल्या लोखंडी प्लेट दिसून आल्याने आरोपी





१) सुभाष महादेव हुमने वय २९ वर्ष रा. नंदनवन झोपडपट्टी नागपुर व फरार आरोपी कबाडी दुकानदार गायकवाड रा. उदासा त्यांना अधिक विचारपुस केली असता त्याच्या ताब्यातील टाटा एस गाडीने WCL मकरधोकडा येथिल RVR कंस्ट्रक्शन कंपनी मध्ये जावून सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. आरोपींचे ताब्यातून



१) ४५ लोखंडी प्लेट प्रत्येकी ४५ किलो प्रत्येकी किंमती १००० /- रू. एकूण किंमती ४५०००/- रू.
२) इतर कबाडी सामान लोखंडी प्लेट, अँगल, लोखंडी दरवाजा, लोखंडी साखेळी व मशीनचे पार्ट किंमत  ५००००/- रू.



३) टाटा ११०९ क्र. MH 31 CQ 3751 किंमती १०,००,००० / – रू. असा एकूण १०९५०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व गुन्हा उघकीस आणला व आरोपी, मुद्देमाल व कागदपत्रे पुढील
तपास प्रक्रियेकरिता पोलिस स्टेशन उमरेड यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलिस अधिक्षक  हर्ष ए. पोद्दार अपर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, पोलिस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, पोलिस अंमलदार राकेश तालेवार यांचे
पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!