अज्ञात ईसमाचे खुनाचा १२ तासाचे आत केला उलगडा,प्रेयसीच निघाली खुनी..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखा आणि बुट्टीबोरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा…

नागपूर (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा व बुट्टीबोरी पोलिसांनी मिळालेली गोपनीय माहिती, कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर १२ तासांच्या आत खुनाच्या गुन्हयाचा उलगडा करून झालेल्या खुनाच्या गुन्हयातील अनोळखी मृतकाची ओळख पटवून महीलेसह दोन आरोपीस बुट्टीबोरी पोलिसांनी अटक केली आहे.





या बाबत मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी  सुधाकर जयराम वानखेडे (वय ५६ वर्ष),रा.मोहगांव वार्ड नं. ०५  पोलिस पाटील मोहगांव यांना शेतकरी बाबूलाल उईके यांनी दिलेल्या माहीतीवरून पोस्टे.बु‌ट्टीबोरी हद्दीतील मौजा मोहगाव येथील साइलीला लेआउट मध्ये एक अनोळखी इसम गळा कापलेल्या स्थितीत पडुन असुन त्याच्या, गळयातून रक्त निघत आहे. अश्या माहीतीवर पोलिस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा केली आणि पोलिसांना कळवले नंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी पोहचुन तात्काळ तपासात चक्रे फिरवली. तसेच फिर्यादी यांनी पोस्टेला तोडी रिपोर्ट दिल्यावरून पोस्टेला कलम १०३ भान्यास अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात ठेऊन सदरचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती



सदर घटनेतील मृतक हा अनोळखी असल्याने पोलिसांना मृतकाची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. बुट्टीबोरी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी गोपनिय खबर व तांत्रीक बाबीचा अभ्यास करून अथक परीश्रम घेवून यातीस म्रुतक याची ओळख पटवून तो संतोष मनोहर चुन्ने रा.तकीया धंतोली नागपूर असल्याचे उघड केले व त्यानंतर मृतकाचे प्रेमसंबंध असलेल्या महीलेचा शोध घेवून ती  महिला नलु गंगाधर पेंदाम (वय ३६ वर्ष), रा.झेंडा चौक तकीया, धंतोली नागपूर हिला ताब्यात घेवून विचारपुस केली असता तिने सांगीतले की, मृतक संतोष मनोहर चुन्ने याचे त्याचे पत्नीसोबत घटस्पोट झाल्यापासुन प्रेमसंबंध होते तो तिला अलीकडच्या काळात खुप त्रास देत होता तसेच तिला व तिचे नव-याला मारहाण करीत होता, म्हणून कंटाळून तिने तिचा साथीदार राहुल रमेश गायकवाड याचे सोबत संगनमत करून एक महिन्यापूर्वीच गुन्हयाचा कट रचुन, संतोष मनोहर चुन्ने यास मौजा मोहगाव येथील साइलीला लेआउट येथे सोबत आणुन मृतकाचा धारदार चाकुने गळा कापुन जिवानिशी ठार मारले आहे. अशा कबुली वरून न्यु गांधी लेआउट, गोदावरी नगर नागपूर येथे राहणारा महीलेचा साथीदार राहुल रमेश गायकवाड (वय ४० वर्ष) यास राहते ठिकाणी शोध घेवून ताब्यात घेवून विचारपुस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरून दोन्ही आरोपींना अटक केली असुन गुन्हा घडल्यापासुन अवघ्या १२ तासांच्या आत मृतकाचा व आरोपीचा शोध घेवून दोन्ही आरोपी बटुटीबोरी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी संयुक्तिक  कार्यवाही करून अटक केले. अटक आरोपी कडुन अधिक तपास सुरू असुन गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव पोस्टे बुटटीबोरी करीत असुन, मा. न्यायालयाकडुन आरोपींचा (दि.९ ऑगस्ट) पर्यंत पीसीआर प्राप्त केला आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी, पूजा गायकवाड यांचे मार्गदर्शनात,पोलिस निरीक्षक स्थागुशा ओमप्रकाश कोकाटे, पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव, सपोनि सतिश मेश्राम, सपोनि प्रशांत लभाने, पोउपनि पालीवाल, मपोउपनि पाथोडे, पोहवा.दिनेश अधापुरे, संजय बांते, निलेश वर्वे, इक्बाल शेख, मयुर डेकले, पोहवा.अरविंद भगत, नापोशि होमेश्वर वाईलकर, पोशि राकेश तालेवार, मपोशि. कविता बछले, पोहवा.आशिष टेकाम,.कृणाल पारधी,. युनूस खान, प्रशांत मांढरे, पोशि.माधव गुट्टे ,दशरथ घुगरे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!