MIDC बुटीबोरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या महीला टोळीचा केला पर्दाफाश…
MIDC परीसरात बंद असलेल्या कंपनीत घरफोडी करणार्या महीला टोळींचा एमआयडीसी बुट्टीबोरी पोलिसांनी केला पर्दाफाश….
बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी वैभव प्रभाकर मोरतकर, वय ५७ वर्ष प्लॉट नं. ८ धंतोली यांनी पोलिस स्टेशन एमआयडीसी बुटीबोरी येथे तक्रार दिली की त्यांची एमआयडीसी बोरी परीसरात राजसी टेक्नोप्लास्ट नावाची कंपनी असुन त्या ठिकाणी प्लॅस्टीक चेअर व कॅरेट्स तयार केले जातात. मागील काही महिन्यापासुन सदरची कंपनी बंद स्थितीत असुन बंद होण्यापुर्वी उत्पादन केलेले प्लास्टीकचे साहित्य व इतर महत्त्वाचे साहित्य कंपनीच्या परिसरातील शेडमध्ये ठेवलेले होते. दि.(२) रोजी दुपारी १२.३० वा. ते ३.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने कंपनी परीसरातील शेडमध्ये प्रवेश करून कंपनीतील टुल बॉक्समध्ये ठेवलेले मोठया क्रमांकाचे पाने, इलेक्ट्रीक मोटार, लोखंडी स्पेअर पार्ट असे महत्त्वाचे साहित्य चोरून नेले अशा तक्रारीवरून अज्ञात ईसमांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन एमआयडीसी बोरी पोलिसांनी तपासाला सुरूवात करून तांत्रीक विश्लेषन व गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून नमुद घटनेती आरोपी हे सांवगी मेघे वर्धा येथील महिला आरोपी असल्याचे गोपनीय माहिती व तांत्रिक तपासा दरम्यान निष्पन्न झाले.त्यानुसार दि (१०) रोजी त्या ठिकाणी जावुन एका महिला आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्या दरम्यान तिला विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता तिने सांगितले की, तिच्या इतर ०३ महिला साथीदारासह नमुद गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच गुन्हयातील चोरलेला मुद्देमाल हा शोएब समीर खान, रा. इतवारा जि. वर्धा यास विकल्याचे सांगितले. त्यानुसार चोरीचा माल
विकत घेणाऱ्या आरोपीला सुद्धा ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. त्याचेकडुन इलेक्ट्रीक मोटार, पाने व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धूमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी पुजा गायकवाड,नागपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि राजीव कर्मलवार, पोउपनि राम खोत, पोहवा दीप पांडे, लक्ष्मण बन्ने, विनायक सातव, श्रीकांत गौरकर,पूजा इंगळे, निखील शेगावकर, उज्वल कोठे यांच्या पथकाने केली.