कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या विरुध्द रामटेक येथे गुन्हा दाखल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोवंशीय जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या  फरार आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन रामटेक येथे गुन्हा दाखल,२२ जनावरांची केली मुक्तता…

रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळीचा सन तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना सतर्क राहुन आपआपले हद्दीत नाकाबंदी,पेट्रोलींग करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याअनुषंगाने दि. १२/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन रामटेक येथील स्टाफ पोलिस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन विश्वसनिय खबर मिळाली की, तुमसर कडुन रामटेक रोडने एका पांढरा रंगाचा मुंडा आणि लाल
रंगाचा डाला असलेल्या मालवाहक १० चक्का ट्रक मध्ये कत्तलीकरीता अवैध्यरित्या जनावरांची वाहतुक होत आहे.





अशा मिळालेल्या माहीतीवरून बसस्टॉप रामटेक समोर नाकाबंदी केली असता तुमसर कडुन येणाऱ्या रोडने मिळालेल्या वर्णनाचा एक पांढऱ्या रंगाचा मुंडा आणि लाल रंगाचा डाला असलेला ट्रक येतांना दिसला. नाकाबंदी करतांना पाहुन सदर ट्रकचा चालकाने
त्याचे ताब्यातील ट्रक नाकाबंदी चालु असलेल्या ठिकाणापासुन अंदाजे ५०० मिटर अगोदरच थांबविला आणि सदर
ट्रकचा चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने पळवुन हिवरा हिवरी गावाकडे नेत असतांना कॅनलच्या जवळ
त्याचे ताब्यातील ट्रक रोडच्या बाजुला लावुन पळुन गेला. सदर ट्रकची पाहणी केली असता सदर ट्रक क्र. MH 35 AJ 1233 च्या मागच्या डाल्यात



१) पांढऱ्या रंगाचे ९ नग बैल किंमती १२,००० /- रु. प्रति नग प्रमाणे एकुण १,०८,०००/- रू., आणि पांढऱ्या रंगाचे ४ नग गोरे किंमती १०,००० /- रु. प्रति नग प्रमाणे एकूण ४०,०००/- रु



२) काळे पांढरे रंगाचे ७ नग गोरे किंमती १०,००० /- रू प्रति नग प्रमाणे एकुण ७०,०००/-रु

३) लाल रंगाचे २ नग बैल किमती १२,००० /- रु. प्रति नग प्रमाणे एकूण २४,००० /- रू., आणि लाल रंगाचे ७ नग गोरे किंमत १०,०००/- रू. प्रति नग प्रमाणे एकूण ७०,००० /- रु.

४) भुरा रंगाचे २ नग गोरे किंमती १०,०००/- रु.प्रति नग प्रमाणे एकुण २०,००० /- रू.

५) तांबुस रंगाचा १ नग गोरा किंमती १०,००० /- रू. असे एकुण ३२
जनावरे एकुण किंमती ३,४२,००० /- रू. आणि टाटा कंपनीचा १० चक्का ट्रक क्र. MH 35 AJ 1233 किं २०,००,०००/- रू. असा एकुण २३,४२,००० /- रु.

चा माल मिळुन आल्याने ट्रक मधील जनावरांची कोणत्याही
प्रकारची चारापाण्याची सोय न करता जनावरांना निर्देयतेने डाल्यामध्ये कोंबुन त्यांचे हात पाय व तोंड दोरीच्या सहाय्याने बांधुन कत्तलीकरीता वाहतुक करतांना दिसुन आल्याने आरोपी टाटा कंपनीचा १० चक्का ट्रक क्र.MH 35 AJ 1233 चा फरार चालक यांचेविरूद्ध कलम प्राणी छळ अधि. ११ (१), (३), (५), महा. प्राणी सर. अधि.,सहकलम ५ (अ). (१), (ब), (५) सहकलम १८४ गोवाका, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जनावरांना चारापाण्यासाठी व देखभालीसाठी गो. विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार, ता. रामटेक जि. नागपूर येथे जमा करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी,रमेश बरकते यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन रामटेक येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक प्रशांत काळे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पोहवा अमोल इंगोले, गजू माहुरे, पोना मंगेश सोनटक्के, प्रफुल रंधई, पोअं शरद गिते, धिरज खंते, रुपेश राठोड यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!