
मॅार्निग वॅाकला जाणाऱ्यांचे जबरीने मोबाईल हिसकावनारी टोळी नांदेड गुन्हे शाखेने केली जेरबंद…
सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल चोरी करणारी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतली ताब्यात….
नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावण्याचे गुन्हयाचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे
शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील सपोनि रवी बाहुळे व पोउपनि आनंद बिचेवार यांची टिम तयार करुन नांदेड शहरातील सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावून चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या.


त्यानुसार दि.(26) रोजी सपोनि रवि वाहुळे व पोउपनि आनंद बिचेवार यांचे टिमला नांदेड शहरात सदर प्रकारच्या गुन्हयातील
आरोपीचा शोध करुन नांदेड शहरात जबरी चोरी करणारे गुन्हेगारावर कार्यवाही करण्याचे आदेश देवुन रवाना केले होते.
सपोनि रवी वाहुळे स्थागुशा यांचे टिम ने नांदेड शहरातील गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन संशईत इसम 1) अब्दुल मुजीब पि. अब्दुल हमीद वय 45 वर्षे रा.खडकपुरा नांदेड 2) शेख इरफान पि.शेख इस्माईल व 36 वर्षे रा.दुलेशहा रहेमान नगर यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन दोन मोबाईल किमती 20,000/- रुपयाचे जप्त केले.
सदरचे मोबाईल हे पो.स्टे.नांदेड ग्रा. गुरन 110 /2023 कलम 394,34 भादवी गुन्हयातील असल्याने त्यांना नांदेड ग्रामीन येथे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.त्याचप्रमाणे आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम ने नांदेड शहरातील गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन नांदेड शहरात सकाळी जबरी चोरी करुन मोबाईल लुटनारे टोळी मधील एक इसम वैभव महेंद्र सुर्यतळे वय 19 वर्षे रा. काबरानगर नांदेड यास ताब्यात घेवुन त्यांचे कडुन एकुण 13 मोबाईल किंमती 2,72,000/- रुपये किमतीचे व गुन्हयात वापरलेली स्कुटी किंमती अंदाजे 50,000/- रुपयाचा असा एकुण
3,22,000/- रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे कडुन पो.स्टे. वजिराबाद गुरन 237/2024 कलम 392,34 भादवी व 238/2024 कलम 379,34 भादवी, पो.स्टे. भाग्यनगर गुरन 219/2024 कलम 392,34 भादवी गुरन 1222/2024 कलम 392,34 भादवी असे गुन्हे उघड झालेले असुन इतर मोबाईलचे गुन्हे बाबत तपास चालू असुन सदर आरोपीस पो.स्टे. वजिराबाद येथे पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस
अधिक्षक भोकर डॅा खंडेराव धरणे, यांचे मार्गदर्शनाखाली,उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक स्थागुशा, सपोनि रवी वाहुळे, पोउपनि श्री आनंद बिचेवार, पोलिस अमलदार माधव केंद्रे, गंगाधर कदम,
गुंडेराव करले, संजीव जिंकलवाड, दिपक पवार, महेश बडगु, रंनधिरसिंह राजबंशी, गजानन बयनवाड, देवा चव्हाण,ज्वालासिंघ बावरी, मोतीराम पवार, तानाजी येळगे, मारोती मोरे, व चालक मारोती मुंडे, हेमंत बिचकेवार, शंकर केंद्रे सायबर सेलचे पोउपनि गंगाप्रसाद दळवी, अमलदार दिपक ओढणे, राजु सिटीकर यांनी पार पाडली



