
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधुन धोकादायक पध्दतीने रीफीलींग करणारे नंदुरबार पोलिसांचे ताब्यात…
नंदुरबार शहर व नवापूर येथे अवैधरित्या गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही,37 सिलेंडर, 07 इलेक्ट्रीक मोटर, 04 वजन काटे असा एकुण 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त…
नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हयात सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच पोलिस अधिक्षक श्रवण दत्त. एस यांनी सर्व प्रभारींना दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून वेळोवेळी अवैध धंद्यावर कडक कारवाई देखील करण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील गाझी नगर परिसर, भोणे फाटा परिसर, पटेलवाडी परिसर तसेच नवापूर येथील सरकार चौक परिसरात काही इसम हे विना परवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस हा मोटारीचे सहाय्याने वाहनांमध्ये भरुन रिफिलींगचा व्यवसाय करीत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलिस अधिक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथके तयार करुन कार्यवाही करण्यासाठी रवाना केले.


स्थानिक गुन्हे शाखेचे नंदुरबार शहरातील पथकाने मिळालेले बातमीनुसार शहरातील वर नमुद वेगवेगळया ठिकाणी जाऊन खात्री केली असता खालील नमुद इसम हे विनापरवाना गॅस रिफिलींग करित असल्याचे दिसून आले. त्यामध्ये 1. गाझी नगर परिसरात अफसरोद्दीन नवाजोद्दीन काझी, वय-27 वर्षे, रा. गाझ् ती नगर, नंदुरबार 2. भोणे फाटा परिसरात दिनेश लोटन चौधरी, वय-50 वर्षे, रा. भाट गल्ली, शनी मंदीराचे जवळ, नंदुरबार, ह.मु.गांधी नगर, नंदुरबार 3. पटेलवाडी परिसरात आसिफ दादाभाई पिंजारी, वय-39 वर्षे, रा. ह.मु. बि.सी. हॉस्टेलसमोर, पटेलवाडी, नंदुरबार 4. पटेलवाडी परिसरात फयाज सईद कुरेशी, वय 19 वर्षे, रा. मंगळ बाजार, नंदुरबार दुकान मालक 5. आमीन वाहीद पिंजारी, रा. पटेलवाडी, नंदुरबार यांचेविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे नंदुरबार शहरातील पथकाकडून कारवाई करण्यात आली. तसेच नवापूर येथील सरदार चौक परिसरात 6. जुनेद फारुक काथावाला, रा. सरदार चौक, श्रीकृष्ण मंदीर समोर, नवापूर याचेविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे नवापूर पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.

सदर अवैधरित्या गॅस रिफिलींग करणा-या नंदुरबार शहर व नवापूर येथील इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत त्यामध्ये 37 सिलेंडर, 07 इलेक्ट्रीक मोटर, 04 वजन काटे असा एकुण 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून नमुद इसमांवर भा.न्या. संहिता कलम 287, 288, 125 सह जिवनाश्यक वस्तु अधि. कलम 3 व 7 प्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलिस अधिक्षक. आशित कांबळे, याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहवा मुकेश तावडे, मनोज नाईक, सजन वाघ, राकेश वसावे, महेंद्र नगराळे, जितेंद्र तोरवणे, विशाल नागरे, दादाभाई मासूळ, राकेश मोरे,नापोशि मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण,पोशि अभय राजपूत, राजेंद्र काटके, यशोदीप ओगले, रामेश्वर चव्हाण, आनंदा मराठे यांनी केली आहे.


