
कोयता घेऊन दहशत माजविणारा नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात…
कोयता घेऊन दहशत माजविणारा नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात…
नाशिक शहर (प्रतिनिधी) – संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते. या मध्ये कोयता घेऊन दहशत माजवीनाऱ्याला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट १ यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे.


या बाबत मिळालेल्या माहितीनूसार, (दि.१०जून) रोजी गुन्हेशाखा युनिट क्र.१ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोअं. मुक्तार शेख यांना गुप्त माहितीदार यांच्याकडून माहिती मिळाली की, इसम नामे असलम लतीफ खान हा गुमशा बाबा दर्गा भागात हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली होती. सदरची माहीती पोअं. मुक्तार शेख यांनी वपोनि. मधुकर कड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि. चेतन श्रीवंत, सपोउनि.सुरेश माळोदे, पोहवा. रमेश कोळी, शरद सोनवणे, आप्पा पानवळ, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, किरण शिरसाठ यांनी जनसेवा हॉटेल समोर, गुमशाहा बाबा दर्गा, भद्रकाली नाशिक येथुन सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. सदर इसमाचे नाव असलम लतीफ खान, (वय-२०वर्षे), रा.फकीरवाडी, दरबाजरोड भद्रकाली नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्याचेकडुन १०००/- रुपये कि. लोखंडी धातुचा कोयता हस्तगत करण्यात आला असुन सदर इसमाविरुध्द भद्रकाली पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारे सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र.१ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि.हेमंत तोडकर, पोउनि.चेतन श्रीवंत, सपोउनि. सुरेश माळोदे, पोहवा. स्मेश कोळी, शरद सोनवणे, पोअं. मुक्तार शेख, आप्पा पानवळ, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, वासपोउनि.किरण शिरसाठ यांनी केलेली आहे.



