
नाशिक शहर गुन्हे शाखेने चोरीच्या दुचाकी केल्या जप्त…
नाशिक शहर गुन्हे शाखेने चोरीच्या दुचाकी केल्या जप्त…
नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहर व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटार सायकल (दुचाकी) चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे बाबत पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त गुन्हे, संदीप मिटके यांनी गुन्हेशाखेला आदेश दिलेले होते. म्हणून त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक माहिती घेऊन कारवाईसाठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर मोटारसायकल चोरट्याला विश्वासात घेऊन चोरीच्या ०४ मोटार सायकल जप्त करून मोटार सायकल चोरीचे सातपुर पो.स्टे-०३, आंडगांव पोलिस स्टेशन ०१ असे गुन्हे उघडकीस आणून एकूण १ लाख ६० हजार/- रू. किं.चा मुद्देमाल हा जप्त केला आहे.


या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.०१जून) रोजी गुन्हेशाखा युनिट २ कडील पोहवा.गुलाब प्रभाकर सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा. गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, सुनिल आहेर, पोअंमल. प्रवीण वानखेडे यांनी आनंदवली पाईपलाईन रोड, नाशिक येथे सापळा रचून इसम नामे शैलेश कांतीलाल गावीत, (वय २६ वर्षे), रा.सदगुरू नगर, मेधणे यांचे घरात भाडेकरू, सातपुर, नाशिक. हा त्याचे ताब्यात असलेली चोरीची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटार सायकल (दुचाकी) विक्री करण्याकरीता येणार असले बाबत गोपनीय माहीती मिळाल्याने त्यास छापा कारवाई करून ताब्यात घेऊन सदर मोटार सायकल बाबत विचारपुस करता त्याने त्याचा मित्र योगेश शिवाजी दाभाडे, रा.नामपुर, ता.सटाणा, जि.नाशिक याचे कडुन विकत घेतल्या असल्याचे सांगितल्याने त्याचेकडे सखोल विचारपुस करता त्याचे कडून चोरीच्या एकुन ०४ मोटार सायकल मिळून आल्याने सदरच्या चोरीच्या मोटार सायकल चोरीचे सातपुर पो.स्टे-०३, आंडगांव पोलीस स्टेशन ०१ असे गुन्हे उघडकीस आणून एकुन १,६०,०००/- रू. किं चा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी सातपुर पोलीस स्टेशन येथे जमा करून गुन्हे उघडकीस आणण्याची उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

अशा प्रकारे सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक ,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा.पोलिस आयुक्त(गुन्हे) संदीप मिटके,वरीष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट २ विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा. गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, शंकर काळे, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, विशाल पाटील, विजय वरंदळ, संजय सानप, वाल्मीक चव्हाण, प्रकाश महाजन, चापोहवा. अतुल पाटील, पोअंमल. प्रवीण वानखेडे, स्वप्निल जुंद्रे यांनी केलेली आहे.



