अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणाऱ्यास युनीट २ ने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरव्दारे वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणारा गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात गुन्हे… 

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गु्न्हे शाखा युनिटला प्राप्त होणा-या तक्रारींची त्वरीत दखल घेवून कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत.





त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट -२, नाशिक शहर येथे प्राप्त झालेल्या तक्रारी पत्रा नुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी दि. २६/०६/२०२४ रोजी तात्काळ पथक तयार करून तक्रारीनुसार सातपुर येथील नंदिनी नदिच्या जवळ असलेल्या गोठया जवळ छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी, इसम शेखर रमेश विसपुते, रा. फ्लॅट नं. ई १०, बिल्डींग नं. ८, मयुरेश्वर अपार्टमेंट, गणपती मंदिराजवळ, अशोकनगर, सातपुर,
नाशिक हा सातपुर येथील नंदिनी नदिच्या जवळ असलेल्या गोठया जवळ त्याचे ताब्यातील घरगुती वापराचे २४ भारत गॅसचे सिलेंडर व ३ पिस्टन कॉम्प्रेसर मशीनसह मिळून आला.



सदर इसम गॅस सिलेंडर मधील गॅस विना परवाना बेकायदेशीररीत्या गॅस सिलेंडर मधून मशिनव्दारे खाजगी वाहनांमध्ये भरण्याचे उद्देशाने बाळगून मिळून आला म्हणून त्याचेविरूध्द सातपुर पोलिस स्टेशन येथे जिवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उप आयुक्त गुन्हे / विशा, प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे संदिप मिटके,गुन्हे शाखा युनीट २ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ येथील सफौ राजेंद्र घुमरे,विवेकानंद पाठक, पोहवा गुलाब सोनार,  मनोहर शिंदे,संजय सानप,वाल्मीक चव्हाण, चंद्रकांत गवळी,  विजय वरंदळ,परमेश्वर दराडे, प्रकाश महाजन,पोशि स्वप्नील जुंद्रे, समाधान वाजे, तेजस मते, प्रवीण वानखेडे, विशाल कुवर, तेजस मते यांनी केलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!