नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने मोटारसायकल चोरी करणारे व ती विकत घेणारे यांना ताब्यात घेऊन उघड केले अनेक गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मोटार सायकल चोरी करणारे ४ व चोरीची मोटर सायकल विकत घेणारा १ असे एकुण ५ इसम जेरबंद ३ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची कामगीरी…

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर परीसरातुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदर कारवाई बाबत पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, (गुन्हे),  संदिप मिटके यांनी कारवाई करणेबाबत गुन्हेशाखा युनिट १ ला  मार्गदर्शन केले होते.





त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट  १ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेत असतांना पोहवा विशाल काठे यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारे दोन इसम गोदापार्क, रामवाडी, पंचवटी, नाशिक येथे काळया रंगाच्या अॅक्टीव्हा मोपेडवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांचेवर कारवाई करणेकामी वपोनि मधुकर कड यांनी आदेशीत करून सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा  प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, संदिप भांड,नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, शरद सोनवणे, पोशि जगेश्वर बोरसे यांचे पथक तयार करून त्यांना मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.



त्यावरून नमुद पथकाने सदर ठिकाणी जावुन मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेता १) अभिजित श्रीराम राऊत वय ३६ वर्षे, रा.. कुमावत गल्ली, रामवाडी, पंचवटी, नाशिक २) विजय नागराज रेडड़ी वय ४३, रा. संजय नगर, वाघाडी, पंचवटी,नाशिक असे त्यांच्या ताब्यातील चोरीची अॅक्टीव्हा मोपेड सह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार ३) श्याम गिरीश ओढेकर रा. डीजीपी नगर, नाशिक ४) कुणाल दत्तात्रय सोनवणे राह. पंचवटी नाशिक यांच्यासह नाशिक शहरातील अंबड, उपनगर व पंचवटी भागातुन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांचकडुन १,००,०००/- रूपये किमतीच्या दोन मोटरसायकल त्यात हिरोहोंडा अॅक्टीव्हा मोपेड क्र. एम. एच. १५ बी.वाय. ९१५० व हिरोहोंडा पॅशन प्रो एम. एच. १५ डी. झेड ९२३२ अशा हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी चोरी केलेली बजाज प्लॅटीना मोसा. क्र. एम. एच. १५ सी.ए. ३८७४ ही राजेश गोपीनाथ साळी या भंगार विक्रेत्यास विक्री केल्याने त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेण्यात आले त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजेश गोपीनाथ साळी, रा-तिवंधा लेन, भद्रकाली नाशिक असे सांगितले असता त्यास विचारपुस करता त्याने सदर मोटरसायकल विकतयघेतल्याचे व स्क्रॅप केले असल्याची कबुली दिल्याने त्यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे.



त्यावरून नाशिक शहर आयुक्तालयातील १) अंबड पोलीस स्टेशन कडील गुरनं. ५०६ / २०२४ भादवि ३७९ प्रमाणे २) उपनगर पोलीस स्टेशन कडील गुरनं. २५९ / २०२४ भादवि ३७९ प्रमाणे ३)पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुरनं. १२१ / २०२४ भादवि ३७९ प्रमाणे असे ०३ गुन्हे उघडकिस आलेले आहेत. तरी सदर आरोपींना जप्त
मुद्देमालासह पुढील कारवाई कामी अंबड व उपनगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे

सदरची कामगिरी पोलिस  कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदिप मिटके,  यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल,सफौ  सुरेश माळोदे, पोहवा विशाल काठे, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, संदिप भांड, शरद सोनवणे, प्रशांत मरकड, योगीराज गायकडवाड, नाझिमखान पठाण, धनंजय शिंदे, पोशि जगेश्वर बोरसे, समाधान पवार अशांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!