
अवैधरित्या गुटख्याची साठवणुक करणारा युनीट १ चे ताब्यात…
अवैधपणे विक्रीकरीता गुटख्याची साठवणुक करणाऱ्यास युनीट १ ने ताब्यात घेऊन,साठा केला जप्त….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, पोलीस,सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा. डॉ. सिताराम कोल्हे, यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखूची अवैधपणे विक्री करणारे इसमांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत सक्त सुचना दिलेल्या आहेत.


त्या अनुषंगाने दि. (३०) रोजी गुन्हे शाखा, युनीट १, नाशिक शहर मधील पोशि अमोल कोष्टी यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा )
अवैद्य विक्री करण्याकरीता नानावली येथील अहमद रजा चौकमधील एका खोलीत साठवणुक करून ठेवलेला आहे.
सदरची माहीती वपोनिरी. मधुकर कड यांना कळविली असता, वपोनिरी मधुकर कड यांनी सपोनि हेमंत तोडकर,पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा महेश साळुंके,पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजेश राठोड, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे व चापोशि समाधान पवार यांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले
होते. त्या अनुषंगाने वरील नमुद पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे अहमद रजा चौक, नानावली भद्रकाली नाशिक घराची पाहणी केली असता एक इसम हा प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा ) अवैद्य विक्री करीत असतांना दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोसिन युनूस सैय्यद, वय – ३१ वर्षे, रा- घर नं ३७३८ अहमद रजा चौक, नानावली
भद्रकाली नाशिक असे सांगुन सदर खोलीची झडती घेतली असता सदर घरात बेकायदेशीर पणे विक्री करीता साठवणुक करून ठेवलेला एकुण किंमत रुपये ९७,२१३ /- रु. किंमतीचा प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखूचा माल (गुटखा ) मिळुन आल्याने त्यास सदरचा गुटखा कोणाकडुन आणला बाबत विचारपुस केली असता
त्याने तो गुटखा वैभव उर्फ अशोक मोराडे यांचेकडुन आणला असल्याचे सांगितल्याने तो जप्त करून सरकारतर्फे पोशि अमोल कोष्टी यांनी फिर्याद देवुन मोसिन युनूस सैय्यद व वैभव उर्फ अशोक मोराडे याचे विरुध्द भद्रकाली पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त,गुन्हे प्रशांत बच्छाव,सहा पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा,
डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक
मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा / महेश साळुंके, योगीराज गायकवाड, पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजेश राठोड, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे व चापोशि समाधान पवार यांनी केली आहे.



