
क्रिकेट बुकीस युनीट १ ने घेतले ताब्यात….
महाराष्ट्र पोलीस
CRIME BRANCH UNIT-1, NASHIK CITY.
IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत इसम जेरबंद
गुन्हे शाखा युनिट – १ ची कामगिरी.
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, यांचेकडुन देण्यात आलेल्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा डॅा.सिताराम कोल्हे यांनी सध्या चालु असलेल्या IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणा-या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.


त्यानुसार दिनांक २६/०३/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे श्रेणी पोउनि रविंद्र बागुल यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आडगाव परिसरातील हॉटेल राजेशाही दरबार,औरंगाबाद रोड, नांदुरनाका नाशिक या हॉटेलच्या पाठीमागे उघडयावर बसुन निशिकांत पगार नावाचा इसम हा सध्या चालु असलेल्या IPL २०२४ च्या चैन्नई सुपर किंग विरूध्द गुजरात टायटन या क्रिकेट सामन्याचे त्याचेकडील मोबाईल
फोनवर थेट प्रक्षेपण पाहुन या खेळावर पैज लावुन जुगार खेळुन सट्टा चालवित असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.सदरची माहीती श्रेणी पोउनि रविंद्र बागुल यांनी वपोनि मधुकर कड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, पोहवा वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे,योगीराज गायकवाड, नापोशि प्रशांत मरकड, विशाल देवरे,पोशि अमोल कोष्टी,जगेश्वर
बोरसे चालक पोहवा नाझीमखान पठाण अशांनी हॉटेल राजेशाही दरबार, औरंगाबाद रोड, नांदुरनाका नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याने त्याचे नाव निशिकांत प्रभाकर पगार, वय-३७वर्षे, रा-सदिच्छा नगर, इंदिरानगर नाशिक यास ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन १८००० /- रुपये किंमतीचा बेटींग लावण्याकरीता वापरण्यात येणारा ०१ टॅब, ०२ मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करून सदर इसमाविरूध्द आडगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असुन गुन्हयातील मुद्देमाल पुढील कारवाईकामी आडगाव पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त,गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट. १ कडील पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, श्रेणी पोउनि रविंद्र बागुल,पोहवा वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे,योगीराज गायकवाड,प्रशांत मरकड, नापोशि विशाल देवरे,अमोल कोष्टी ,जगेश्वर बोरसे चालक पोहवा नाझीमखान पठाण अशांनी केलेली आहे.



