
दिंडोंरी हद्दीत नाशिक ग्रामीण स्थागुशा ने पकडला ६.६४ लक्ष रु चा गुटखा….
दिंडोरी पोलिस स्टेशन हद्दीतील रासेगाव शिवारात ६. ६४ लाखांचा अवैध गुटखा जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई….


नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर नाशिक जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने आज दि(१६) रोजी रात्रीचे सुमारास दिंडोरी पोलिस ठाणे हद्दीत पेठ-गुजरात महामार्गावर रागाव फाटा परिसरात काही संशयीत इसम एका राखाडी रंगाचे इनोव्हा कारमध्ये गुटख्याची
अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याचे उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती.

त्यानूसार स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिंडोरी पो.स्टे. हद्दीत रासेगाव फाटा परिसरात सापळा रचून इनोव्हा कार क्र. एम. एच.०१- बी.एफ.७२०८ मध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम नामे १) आसिफ शफिक पठाण,वय २६, रा. वडाळा गाव, भारतनगर, नाशिक यास ताब्यात घेतले. त्यांचे कब्जातून ६,६४,५३० /- रूपये किंमतीचा अवैध गुटखा व इनोव्हा कार असा एकुण १४,६४,५३० /- रू. किं.चा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरचा अवैध गुटखा पुरवठा करणारे गुजरात राज्यातील खरेदी करणारे संशयीत यांचा देखील पोलीस पथक शोध घेत आहे. यातील इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठ्यास प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत / स्वादीष्ट तंबाखू, पानमसाला, सुगंधीत स्वादीष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे, हे माहिती असतांना देखील स्वत:चे फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करतांना मिळून आले असून त्यांचेविरूध्द दिंडोरी पोलीस ठाणेस गुरनं २०१ / २०२४ भादवि कलम ३२८, १८८, २७२, २७३
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हयाचे सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश
शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा किशोर खराटे, प्रविण सानप, पोना प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, विनोद टिळे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.


