मालेगाव परीसरातुन सराईत मोटारसायकल चोरटे स्थागुशा पथकाने शोधुन वेगवेगळ्या गुन्ह्यातील १३ मोटारसायकल केल्या जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

मालेगावातील सराईत मोटर सायकल चोरांचा पर्दाफाश चोरीच्या १३ मोटर सायकल केल्या जप्त…

मालेगाव(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक ग्रामीण जिल्हयातील मालेगाव शहरासह नजीकचे तालुक्यांमध्ये मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी  पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी प्रलंबित  गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव  अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेगबिरसिंग संधु, उपविभागीय पोलिस अधिकारी कॅम्प विभाग  सुरज
गुंजाळ यांनी मालेगावातील उघड न झालेले मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे मालेगाव शहरातील मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहरातील आयुबी चौक परिसरात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विक्री
करण्याचे उद्देशाने येणार असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून पोलीस पथकाने आयुबी चौक परिसरात सापळा रचून संशयीत नामे १) ईकलाख अहमद इम्तियाज अहमद, वय २३, रा. ईस्लामाबाद, रविवार वार्ड, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्याचे कब्जात मिळून आलेल्या हिरो स्प्लेंडर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने व त्याचा
साथीदार २) जहिर अहमद अब्दुल, रा. संगमेश्वर मालेगाव अशा दोघांनी मिळून सदरची मोटर सायकल सौंदाणे, ता.
मालेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेला आरोपी ईकलाख अहमद यास अधिक विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार जहिर अब्दुल याचेसह मालेगाव शहर, सटाणा, चांदवड, येवला, जळगाव, नाशिक शहर अशा ठिकाणांवरून एकूण १३ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीचे कब्जातुन ०७ हिरो स्प्लेंडर, ०२ होन्डा शाईन, ०१ ड्रिम युगा, ०१ हिरो एच. एफ. डिलक्स, ०१ यामाहा एस. एस., ०१ हिरो पॅशन
अशा एकुण १३ चोरीच्या मोटर सायकल किं.रू. ६,२५,०००/- रूपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपीने कबुली दिल्यावरून मालेगाव तालुका, सटाणा, चांदवड, येवला तालुका, मालेगाव छावणी, जळगाव
जिल्हापेठ, भद्रकाली पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे ०६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर गुन्हयांतील आरोपींनी चोरी केलेल्या मोटर सायकल खरेदी करणारे इसम नामे १) निसार अहमद अक्सर हुसेन, रा. देवीचा मळा, मालेगाव, २) मुजिब अहमद जमील अहमद, रा. संगमेश्वर, मालेगाव, ३) फरान अहमद इम्रान अहमद, रा. मरीमाता मंदिराचे समोर, मालेगाव, ४) शोएब मोहमद अजहर, रा. टेंशन चौक, मालेगाव, ५)
मोहमद शोएब मोहमद इद्रिस, रा. नयापुरा, काबुल चौक, मालेगाव, ६) भिकन दादामिया पिंजारी, रा. देवीचा मळा, मालेगाव यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे. यातील आरोपींना मालेगाव छावणी पोलिस ठाणेकडील गुरनं ३२३ / २०२३ भादवि कलम ३७९ या गुन्हयात हजर करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी ईकलाख अहमद याचा साथीदार जहिर अब्दुल हा फरार असून पोलीस पथक त्याचा
कसोशिने शोध घेत आहे, सदर आरोपींकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक मालेगाव  अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेगबीरसिंग संधु, उपविभागीय पोलिस अधिकारी कॅम्प विभाग  सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजु सुर्वे, सपोनि हेमंत पाटील, पोहवा चेतन संवस्तरकर, संतोष हजारे, सुनिल पाडवी, नापोशि देवा गोविंद, पोशि गिरीष बागुल, विनोद टिळे,हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने मोटर सायकल चोरीचे ०६ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!