
पिस्टल अन् कोयत्याच्या धाकावर लूटमार करणाऱ्या तिघांना निगडी पोलिसांनी केली अटक…
पिस्टल अन् कोयत्याच्या धाकावर लूटमार करणाऱ्या तिघांना निगडी पोलिसांनी केली अटक…


पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – पिस्टल आणि कोयत्याच्या धाकावर लूटमार करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन कोयते आणि १ लाख ३५ हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून फिर्यादीला पिस्टल व कोयताचा धाक दाखवून त्यांचेकडून ७०००/- रू लुटमार करून नेल्याने निगडी पोलिस ठाणेस गु.र.नं. २६६/२०२४ भा.दं. वि. सं. कलम ३९२,५०६,३४ आर्म ॲक्ट ३(२५),४(२५), प्रमाणे (दि.२३मे) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या बाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी हे हडपसर भागात राहत असून ते एका पिकअप गाडीवर चालक आहेत. (दि.२१मे) रोजी रात्री ते व त्याचा मित्र असे त्याचेकडील पिकअप गाडीमध्ये हडपसर येथून तळेगाव दाभाडे येथे माल सोडण्यासाठी जात असताना पुणे मुंबई जुना हायवे खंडोबा माळ चौकासमोर गाडीचे टायर गरम झाल्याचे कारणावरून रस्त्याचे कडेला थांबले असताना पहाटे ०५.०० वा.सु. एक निळ्या रंगाचे बुलेट मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी तीन इसमांनी त्या ठिकाणी येवून त्यांना ते पोलीस आहेत असे सांगून त्यांना पिस्टल व कोयताचा धाक दाखवून त्यांचेकडून ७०००/- रू. लुटमार करून नेल्याने निगडी पोलिस ठाणेस गु.र.नं. २६६/२०२४ भा.दं. वि. सं. कलम ३९२,५०६,३४ आर्म ॲक्ट ३(२५),४(२५), प्रमाणे (दि.२३मे) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यावर आम्ही वरिष्ठ पोलिस निरीक्षक निगडी यांना तात्काळ यातील आरोपीचा शोध घेवून आरोपी अटक करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार निगडी पोलिस ठाणे येथील तपास पथकाच्या दोन टिम तयार करुन गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध सुरू केला. सदर पथकाने परिसरातील सी.सी.टी.व्ही.फुटेज तपासाला सुरुवात करून आरोपींचा मार्ग काढत २५० ते ३०० सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून आरोपी हे गुन्हा केल्यानंतर खेड शिवापुर पुणे परीसरात गेले असल्याचे निष्पन्न करून त्याप्रमाणे खेड शिवापूर येथील एका लॉज बाहेरून तपास पथकानी सापळा लावून आरोपी १) आकाश मनोज लोट (वय-२२ वर्षे) रा.फ्लॅट नं.११११, ३-विंग, ऐश्वर्याम हमारा सोसायटी, मोशी पुणे २) सनी ऊर्फ अशुतोष अशोक परदेशी ऊर्फ रोकडे (वय- ३२ वर्षे) रा.रुम नं.२४, बिल्डींग नं.एस, मिलींद नगर, पिंपरी पुणे. ३) अनिकेत गौतम शिंदे (वय-२४ वर्षे) रा.अजय बिराजदार यांच्याकडे भाड्याने, पाटीलनगर, चिखली पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून ०१ लोखंडी पिस्टल, ०२ मोबाईल फोन, ०२ लोखंडी कोयते व गुन्हयात वापरलेली ०१ बुलेट मोटार सायकल असा एकूण १,३५,४००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यातील पहिल्या आरोपीवर ०२, दुसऱ्या ०७, आणि तिसऱ्यावर ०२ गुन्हे दाखल आहेत.
अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त, परीमंडळ १ स्वप्ना गोरे,सहा पोलिस आयुक्त, चिंचवड विभाग राजु मोरे यांचे मार्गदर्शनाखाली निगडी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी,पोलिस निरीक्षक गुन्हे तेजस्विनी कदम सहा पोलिस निरीक्षक, अंबरिष देशमुख पोहवा दत्ता शिंदे, सुधाकर आवताडे, राहुल गायकवाड, विनोद व्होनमाने, भुपेंद्र चौधरी, सिद्राम बाब, तुषार गेंगजे, प्रविण बांबळे, विनायक मराठे, सुनिल पवार, केशव चेपटे, तसेच सी.सी.टी.व्ही. कंट्रोल रूम येथील मपोशी स्वप्नाली म्हसकर आणि सारीका अंकुश यांनी केली आहे.


