
पालम नदी पात्रात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या प्रेताचे गुढ उकलले…
परभणी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन,पालम हद्दीत भोगाव शिवारात नदीपात्रात पुरूषाचे प्रेत तरंगत असल्याची माहिती
मिळाल्यावरून पो.स्टे. पालम येथे अ.मृ. क्र. 22/2023 दाखल करण्यात आला होता त्यातून पुढील तपासात सदर व्यक्तीचा मृत्यू हा घातपातातून घडला असल्याचे पुढे आल्याने त्याचे तीन मारेकरी
निष्पन्न करत तीनही मारेकऱ्यांना परभणी पोलिसांनी घेतले
दिनांक 06/10/2023 रोजी 12.30 वा.चे सुमारास मौजे भोगाव शिवारात गोदावरी नदी पात्रात एक अनोळखी पुरूषाचे प्रेत तरंगत असल्याची माहिती मिळाल्यावरून पो.स्टे पालम येथे अ.मृ. क्र.
22/2023 कलम 174 फौ.प्र. संहिते प्रमाणे दाखल करण्यात आला. त्याचा तपास पोउपनि जाधव, पो.स्टे. पालम हे करत होते. सदर मयताची ओळख पटविण्यात आली असता असे पुढे आले की मयताचे नाव
सय्यद मुदस्सीर सय्यद इब्राहीम, वय 25 वर्षे, रा. उखळद, ता.जि. परभणी
असे आहे. सदर व्यक्ती दिनांक 04/10/2023 रोजी पासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस स्टेशन ताडकळस येथे व्यक्ती मिसींग क्र. 13/2023 प्रमाणे दाखल आहे. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी सदरचे प्रेत इकडे कसे आले याची सखोल चौकशी करून गुन्हा उघडकीस आणून आरोपी निष्पन्न करणे बाबत पो.स्टे. पालम व स्था. गु. शा. प्रभारी अधिकारी यांना आदेश व सुचना दिल्या. त्यावरून स्था.गु.शा. परभणी व पो.स्टे. पालम येथील अधिकारी व अंमलदारांची विवीध पथके तयार करण्यात आली होती
त्यामधून दिनांक 10/10/2023 रोजी गोपनिय माहितीचे व तांत्रीक तपासातून अशी खात्रीशीर माहिती मिळाली की


1) राजेश सुभाष बागल, वय 25 वर्षे,

2) गणेश सतिश भुसारे, वय 21 वर्षे व

3) सुनिल पिराजी दासलवाड, वय 18 वर्षे, सर्व उखळद, ता.जी.परभणी
यांनी मयतास मारले असावे. त्यावरून स्था.गु.शा. परभणी व पो.स्टे. पालम येथील पथक रवाना करून आरोपी राजेशससुभाष बागल व सुनिल पिराजी दासलवाड यांना स्था.गु.शा. चे पथकाने व आरोपी गणेश सतिश भुसारे यास पो.स्टे. पालम येथील पथकाने ताब्यात घेतले असता त्यांनी महिती दिली की, मयताने व त्याचे भावाने राजेश सुभाष बागल यासोबत झालेल्या भांडणाचे रागातून तसेच मयत हा इतरांना नेहमी त्रास देत असे याचा राग मनात धरून मयतास दारू पाजून त्याचा गळादाबून बेशूध्द केले व गाडीचे
डीक्कीत टाकून नवागड जवळील सारंगी पुलावरून नदी पात्रात फेकून दिल्याचे सांगीतले आहे.
त्यावरून तपासी अधिकारी पोउपनि डी.एस. जाधव यांचे फिर्यादीवरून पो.स्टे.पालम येथे गु.र.नं. 229/2023 कलम 302, 120 (ब), 201 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीनही आरोपींना गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेण्यात
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. व अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे साहेब उपविपोअ परभणी ग्रामीण . राजेंद्र शिरतोडे, व उपविपोअ पुर्णा ब्रम्हदेव गावडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.स्था.गु.शा. वसंत चव्हाण, स.पो.नि. कपील शेळके,पो.स्टे. ताडकळस, स.पो.नि.पांडुरंग भारती, पोउपनि अजीत बिरादार, .गोपिनाथ वाघमारे, पोलिस अंमलदार बालासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान पठाण, जगन्नाथ भोसले, आशा सावंत, विलास सातपूते, विष्णु चव्हाण, मधूकर ढवळे, शेख रफीयोद्दीन, निलेश परसोडे, केंद्रे, इम्रान सर्व नेमणुक स्था.गु.शा. पो.नि. . गाडेवाड, स.पो.नि. कारवार, पोउपनि जाधव, अंमलदार केंद्रे, चव्हाण, केदार सर्व ने. पो.स्टे. पालम तसेच व सायबर सेल चे शेख शारेक, स्वप्नील पोतदार, राजेश आगाशे, प्रशांत लटपटे, गणेश कौटकर यांनी मिळून केली.


