स्थानिक गुन्हे शाखेने सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले २२ गुन्हे…..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सराईत वाहन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन उघड केले २२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले…..

परभणी (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून सोनपेठ येथून (छोटा हत्ती) चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्था.गु.शा. च्या पथकाने 24 तासांच्या आत मुद्देमालासह ताब्यात घेऊन विविध पोलिस ठाण्यातील एकूण 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत.





या बाबत सविस्तर वृत्त असे की, दि.30 मार्च 23.00 ते 31 मार्च चे 03.30 वा. दरम्यान फिर्यादी सय्यद मोहसीन सय्यद मुसा, रा.इंदीरा नगर सोनपेठ यांनी त्यांचे TATA ACE वाहन क्रमांक MH22AA1180 किं. 75,000/- रु  व त्यामध्ये 16,000/- रु सेंट्रींगचे साहित्य भरून घरासमोर ऊभे केलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. सदर प्रकरणी पो.स्टे. सानपेठ येथे गु.र.नं. 113/2024 कलम 379 भा.दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



सदर गुन्ह्याचा पो.स्टे. सानपेठ व स्था.गु.शा. परभणी यांचेकडून समांतर तपास सुरू असताना दि.31मार्च रोजी अशोक घोरबांड, पोलिस निरीक्षक स्था.गु.शा. परभणी यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार बालाजी पंडीत काळे, रा.घोडा कौडगांव, ता.परळी, जि.बिड याने केला असून तो सदर वाहन विक्री करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेलेला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी स्था.गु.शा. चे सहा. पोलिस निरीक्षक पी.डी. भारती व स्टाफ यांचे पथक तयार करून सदर आरोपीचे शोध घेणे कामी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना केले. सदर पथकाने वरील नमूद आरोपीस (दि.01 एप्रिल) रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पकडून त्याचे कडून चोरलेला टाटा ACE वाहन क्र. MH22AA1180 हा जप्त करून सिरसाळा, बीड, आंबाजोगाई ग्रा. परळी ग्रा. आंबाजोगाई शहर, शिवाजी नगर बीड, शिरसाळा, दिंद्रुड, गेवराई, फौजदारी चावडी सोलापूर शहर, सिव्हील लाईन जि.अकोला, परळी शहर, गेवराई बीड या सर्व पोलिस ठाण्यातील एकूण 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत.



सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, स.पो.नि. पी.डी.भारती, राजीव मुत्येपोड, पोउपनि गोपीनाथ वाघमारे, अजीत बिरादार, चंदन परिहार व पोलिस अंमलदार राहूल परसोडे, सचिन भदरर्गे, दिलीप निलपत्रेवार, हनुमान ढगे, परसराम गायकवाड, रंगनाथ दुधाटे, कैलास केंद्रे, बालासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, दिलावर खान, विलास सातपुते, विष्णू चव्हाण, सिध्देश्वर चाटे, शेख रफीयोदिन, निलेश परसोडे, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, राम पौळ, ने. स्था.गु.शा. पोलिस अंमलदार गणेश कौटकर सायबर यांनी मिळून केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!