परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात ५ लक्ष रु चा प्रतिबंधीत गुटखा जप्त….
स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात लाखो रुपयाचा प्रतिबंधीत गुटखा जप्त….
परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 18/03/2024 रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची गस्त चालु असतांना खात्रीशिर मिळालेल्या माहिती वरुन सापळा रचुन पाठलाग करुन गुटख्याची वाहतुक करणा-या एका इनोव्हा गाडीस ताब्यात घेवुन झडती घेण्यात आली असता सदर इन्होव्हा गाडी मध्ये
शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा मिळुन आला. या छाप्या मध्ये इन्होवा गाडी मध्ये एकुण 36 पोते अढळुन आले प्रत्येकी एका पोत्यामध्ये 70 पुडे गोवा 1000 गुटखा असे लेबल असलेले पुडे प्रत्येकी एका पुडयाची किमत 210/-रु असा एकुण 5,29200/-रु मुददेमाल तसेच 500000/- रुपये किमती वाहन इन्होवा क्रमांक एमएच 04
डिएन 6197 असा आरटीओ पासींग क्रमांक असलेले चारचाकी वाहन चालक नामे (1) नरू वाघ रा.पोखर्णी (2) अफरोज पठाण (3) शेख रोफ शेख जियाउदीन दोन्ही रा. परळी (4) ज्ञानेश्वर बाराकुते रा. माळसोन्ना ( 5 ) सयद अब्बास रा. परभणी तसेच ( 6 ) वाहानाचे मालक यांचे विरूध्द पोस्टे दैठणा गुरं न 81 / 2024 कलम 328, 272, 273, 188 भा.दं.वि प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आला असुन या छाप्यात चारचाकी वाहन इनोव्हा व गुटखा असा एकुण 10, 29,200/-रु मुददेमाल जप्त करण्यात आला असुन वरील कलमान्वये गुन्हा नोंद केला व पुढील तपास सुरु आहे
सदर कामगिरी पोलिस अधिक्षक रविंन्द्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, अशोक घोरबांड पोलिस निरिक्षक स्था.गु.शा परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुत्येपोड, पोलिस अमंलदार परसराम गायकवाड, राहुल परसोडे, दिलीप निलपत्रेवार, चालक केंन्द्रे, इम्रान, रवि जाधव ने स्था.गु.शा बालाजी रेडडी, गणेश कौटकर, राजेश आगाशे ने. सायबर पोस्टे यांनी मिळुन पार पाडली आहे.