गंगाखेड बसस्थानकात बसमधे चढतांना महीलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणार्या महीला आरोपींना २४ तासाच्या आत केली अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गंगाखेड(परभणी) – सवीस्तर व्रुत्त असे की  गंगाखेड बसस्थानकात महिला बस मध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून महिलेच्या
गळ्यातील गंठण (मंगलसुत्र)चोरले होते. त्याअनुषंगाने गंगाखेड पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी अवघ्या 48 तासातच
सदर आरोपीतांचा शोध लावून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.दिनांक 19/10/2023 रोजी फिर्यादी ही गंगाखेड बस स्थानक येथे कळमनुरी सोलापुर या बसमध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीस नकळत फिर्यादीचे गळ्यातील 100 सोन्याचे मनी असलेले व समोर डिजाइनमध्ये सोन्याचे पान असलेले 10 ग्रॅम वजनाचे गंठण( मंगळसुत्र) चोरी केले म्हणुन पोलिस ठाणे गंगाखेड येथे 475/2023 कलम 379 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक परभणी श्रीमती रागसुधा आर. मॅडम, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे ,उप विभागीय पोलिस अधिकारी, गंगाखेड डॉ.  दिलीप टिपरसे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. गंगाखेड  कुंदन कुमार वाघमारे व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने माहिती घेत असतांना खात्रीशीर व गोपनिय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा देगलूर नाका, नांदेड येथील काही महिलांनी व एक तृतीय पंथी व्यक्ती ने मिळून केलेला आहे. व ते सध्या गंगाखेडमध्ये वास्तव्यास आहेत.
त्यावरून माहिती घेवून सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी

1) रंजना रवी जोंधळे, वय 42 वर्ष,





2) राखी हिरा हातवळणे, वय 30 वर्ष,



3) तृतीयपंथी- राजश्री राजू जोंधळे, वय 40 वर्ष, सर्व रा. शांती
नगर, देगलूर नाका, नांदेड



यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिलेली असून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी 20,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला
आहे.
सदर ची कारवाही पोलिस अधीक्षक परभणी श्रीमती रागसुधा आर. मॅडम, अपर पोलिस अधीक्षक  यशवंत काळे ,उप विभागीय पोलिस अधिकारी, गंगाखेड डॉ. श्री. दिलीप टिपरसे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. गंगाखेड कुंदन कुमार वाघमारे पोउपनि बुधोडकर, चिट्टेवाड, मपोउपनि भोंडवे, पोलिस अमलदार शंकर रेंगे, गोविंद कदम, साजिद, मुंडे, शेख व पांढरे व महिला होमगार्ड यांनी मिळून केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!