
सहा महीन्याआधी झालेल्या खुनाचा वाकड पोलिसांनी केला उलगडा…
वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख
सवीस्तर व्रुत्त असे की थेरगाव परीसरातील इसम दिनेश दशरथ कांबळे, वय २६ वर्षे, रा. एकता कॉलनी, थेरगाव, पुणे हा मागील ६महिन्यांपासून मिसिंग असलेबाबत त्याची आई माया दशरथ कांबळे, य ५० वर्षे, रा. एकता कॉलनी, बापुजी बुवा नगर, थेरगाव,पुणे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलिस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र. २६८ / २०२३ प्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आली. होती त्यानुसार तपास करी असतांना एक तरुण ०६ महीन्यापुर्वी मिसींग झाला असुन त्याचे हरविले तारीख व पोलिस ठाणे मध्ये तक्रार दिलेली तारीख यामध्येमोठी तफावत असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखुन गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकड पोलिस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलिस अंमलदारांना मिसींगव्यक्तीचा सर्वोतोपरी शोध घेणेबाबत आदेश दिले.होते त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार मिसींगचा शोध घेत असताना मिसींग व्यक्तीचे आई वडीलांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, त्यांचा मुलगा दिनेश कांबळे हा कोणताही कामधंदा करीत नव्हता तसेच यापुर्वीही तो तीन ते चार वेळा १० ते १५ दिवसांकरीता त्याचे मित्र परीवाराकडे राहणेस जावुन परत आला होता. मात्र यावेळी त्याने घरातील त्याचे वडीलांची सोन्याची चैन न सांगता घेवुन गेला होता त्यामुळे त्याचे आईने त्याचा जाब विचारला असता दोन दिवसांमध्ये चैन परत आणतो असे सांगुन तो घरातुन निघुन गेला होता. तो अद्याप परत आला नाही.मिसींग व्यक्तीचा शोध घेणेकरीता ते रहात असलेले थेरगाव परीसरात बातमीदाराकडुन माहीती प्राप्त करुन मिसींग व्यक्ती दिनेश कांबळे याचा मित्र ज्ञानेश्वर बिभीषण मोटे व श्रवण ज्ञानेश्वर मोटे दोघे रा. अशोका सोसायटी, रुम नं. २१, थेरगाव, पुणेयांचेकडे चौकशी केली असता माहीती मिळाली की, दिनांक १५/०३/२०२३ रोजी रात्री ९:३० वा. चे सुमारास काळेवाडी फाटाशेजारील ग्राऊंडवर दिनेश कांबळे हा त्याचे मित्र सिध्दांत रतन पाचपिंडे व प्रतिक रमेश सरवदे यांचेसह दारु प्यायला बसला होता
त्यावेळी त्यांचेमध्ये भांडण झाले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. परंतु दिनेश सध्या कुठे आहे याबाबत त्याला माहीती नाही.त्यामुळे यातील संशईत इसम


१) सिध्दांत रतन पाचपिंडे, वय २३ वर्षे, रा. गुरुनानक नयागर कॉलनी नं. ०३, रहाटणी, पुणे व

२) प्रतिक रमेश सरवदे, वय २५ वर्षे, रा. विद्यार्थी विचार प्रशाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी, कुदळवाडी, चिखली, पुणे

यांना तांत्रीक तपासाद्वारेताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, दिनांक १५/०३/२०२३ रोजी रात्री दिनेश कांबळे हा त्यांचे सोबत होता. त्या तिघांनी सुरवातीस पिंपरी मध्ये दारु पिली त्यानंतर ते तिघे अॅक्सेस मोपेड वरुन काळेवाडी फाटा येथे आले तेथे असणारे मोकळे मैदानात पुन्हा दारु पिण्यास बसले होते. त्यावेळी दिनेश कांबळे याने प्रतिक सरवदे याचे पत्नीबाबत अश्लिल भाषा वापरण्यास सुरुवात केल्याने त्यांचेत भांडण सुरु झाले. भांडणात प्रतिक रमेश सरवदे व सिध्दांत रतन पाचपिंडे यांनी दिनेश याचे डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्यास जखमी केले व तेथुन निघुन गेले परंतु काही वेळाने ते दोघेही रात्री ११:०० वा. सुमा. पुन्हा माघारी आले व जखमी दिनेश यास अॅक्सेस मोपेडवर मध्ये बसवुन औंध नंतर दापोडी येथे घेवुन जावुन दि. १६/०३/२०२३ रोजी ०२.१५ वा.सु. पुणेमुंबई रोडवर मेट्रो पोल नंबर एन. पी. ०९ चे जवळ, कासारवाडी, पुणे येथे नाशिक फाटा ब्रिज वरुन दिनेश कांबळे याला खाली फेकुन देवून त्याचा खुन केला असे सांगीतले. दिनेश कांबळे यास ब्रिजवरुन खाली फेकुन दिल्याने तो जागीच मयत झाला. दिनेशकांबळे हा जुना पुणे मुंबई रोडवर मयत अवस्थेत मिळुन आला परंतु त्याचे अंगावर त्याची ओळख पटविणेबाबतचा कोणताच पुरावा नसल्याने बेवारस व्यक्तीचा अपघात बाबत भोसरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २२६ / २०२३, भादंवि कलम ३०४ (अ), २७९,१८४,१३२(१)(सी), १९९, १७७, १३४ (ए), १३४ (बी) प्रमाणे दिनांक १६/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे
१) सिध्दांत रतन पाचपिंडे, वय २३ वर्षे, रा. गुरुनानक नगर कॉलनी नं. ०३, रहाटणी, पुणे व
२) प्रतिक रमेशसरवदे, वय २५ वर्षे, रा. विद्यार्थी विचार प्रशाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी, कुदळवाडी, चिखली, पुणे
यांना ताब्यात घेवून भोसरीपोलीस स्टेशनचे गुन्हयामध्ये मनुष्यवधाचा प्रकार असल्याचे व आरोपी निष्पन्न झालेबाबत रिपोर्ट सादर करुन आरोपी ताब्यात देण्यात आले आहेत. सदरबाबत पुढील तपास भोसरी पोलिस स्टेशन करीत आहे. वाकड पोलिस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिसिंग तक्रार दाखल झाल्यापासून दिवस-रात्र अथक परिश्रम करुन ३६ तासात सदर प्रकरणाचा उलघडा केला आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे ,सह-पोलीस आयुक्त . डॉ. संजय शिंदे ,अपर पोलिस आयुक्त. वसंत परदेशी,पोलिस उपायुक्त परीमंडळ २ . डॉ. काकासाहेब डोळे , सह-पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, .रामचंद्र घाडगे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण,सपोफौ.बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा वंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, स्वप्निल खेतले, दिपक साबळे,अतिश जाधव, प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे,पोशि. अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर,सागर पंडीत सर्व परीमंडळ – ०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.
.


