सराईत सोनसाखळी चोरास चिखली पोलिसांनी केली अटक,२ गुन्ह्याची केली उकल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चिखली(पिंपरी चिंचवड)महेश बुलाख –  सवीस्तर व्रुत्त असे की सध्या दिवाळी सणाची धामधुम असल्याने मोठया प्रमाणात महिला व नागरिक हे बाजारामध्ये कपडे, दागिने, इत्यादींची खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. याचाच फायदा घेवुन सोनसाखळी चोर हे बाजारामध्ये दागिने घालुन आलेल्या महिलांवर पाळत ठेवुन त्या रोडने चालत जात असताना अचानकपणे येवुन महिलांचे अंगावर असलेले दागिने जबरदस्तीने ओढुन खेचुन जबरी चोरी करतात. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने  संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३ यांचे मागदर्शक सुचनेवरून चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत बाजारामध्ये गर्दीचे ठिकाणी पेट्रोलिंग नेमण्यात आली असुन सोनसाखळी चोरांना पकडण्याकरीता वेळोवेळी ट्रॅप लावण्यात आले होते. तरी पण एक महीला

सौ रुचिता गौरव महाजन, वय २४ वर्षे, धंदा.- गृहीणी, रा. मुळगांव मु.पो. सिंधखेडा ता. रावेर जि. जळगाव सध्या रा.सी / ओ सुजाता कंराडे या दिवाळीचे सणाकरीता माहेरी जाधववाडी चिखली





पुणे येथे आल्या असता त्या दिनांक ०७/११/२०२३ रोजी १९.४५ वाजताचे सुमारास राहते घरातुन पायी चालत जात असताना राजे शिवाजीनगर, गार्डनसमोर, रस्त्यावर, जाधववाडी, चिखली, पुणे येथे आल्यावेळी एका इसमाने अचानकपणे समोर येवुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारुन ओढुन ते जबरी चोरी करुन घेवुन पळुन गेला. त्याच्या तक्रारीवरुन चिखली पोलिस स्टेशन गु.रजि. नंबर ७३२ / २०२३, भादवी कलम ३९२ प्रमाणे गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक तौफिक
सय्यद हे करत होते.
अश्याच प्रकारची घटना दि.२६.१००२३ रोजी रामायण मैदान, जाधववाडी या ठिकाणिही झालेली होती. त्याबाबत चिखली पोलिस स्टेशन गु.र.क्र. ७०३ / २०२३ कलम ३९२ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.
दोन्ही घटनामधील आरोपी हा एकच असल्याचे फिर्यादी सांगत होते. परंतू कोणताही पुरावा नसल्याने अश्या सोनसाखळी चोराला पकडणे हे पोलीसांसमोर एक आव्हान होते. चिखली पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक  ज्ञानेश्वर काटकर यांचे मार्गदर्शनानुसार तपास अधिकारी सपोनि तौफिक सय्यद यांनी त्याचे पथकातील कर्मचा-याच्या मदतीने दोन्ही घटनास्थळाचे परीसरातील सिसिटिव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यांना सदरचा गुन्हा हा अंगाने मध्यम, हिरव्या रंगाचा टी शर्ट, दाढी वाढलेली, काळे रंगाची पॅन्ट करुन अंदाजे वय २२ ते २५ वर्षे या वर्णनाच्या इसमाने केला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त
झाले होते. त्याप्रमाणे जाधववाडी परिसरातील बाजारामध्ये गुन्हे प्रगटीकरण शखाचे सपोनि  तौफिक सैय्यद  व टीम भोर यांनी पेट्रालिंग दरम्यान वरील वर्णनाचा इसम हा पुन्हा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना त्याच्या हालचालीवरुन आरोपीस ओळखुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता
त्याने त्याचे नाव व पत्ता



रोहित दशरथ गावडे वय २३ वर्षे, सध्या रा. दत्तनगर, राहुल जाधव यांचे ऑफीसचे मागे, श्री. बबन दरगुडे यांची रुम, दुसरा मजला, जाधववाडी, चिखली पुणे, मुळ राह. मु. पो. जंक्शन लासुर्णे, ता. इंदापुर, जि. पुणे



असे असल्याचे सांगितले. त्यास पोलिसांचा खाक्या दाखवताच
त्याने दोन्ही गुन्हयाची कबुली दिली असुन त्याचेकडुन दोन्ही गुन्हयातील चोरीस गेलेली सोन्याची दोन्ही मंगळसुत्र हस्तगत करण्यात आलेले आहेत.
अश्या प्रकाराने चिखली पोलीस स्टेशनकडील सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

सदरची कामगिरी  संदीप डोईफोडे, पोलिस उपआयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड, विवेक मुंगळीकर, सहा. पोलिस उपायुक्त, भोसरी विभाग, . ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सपोनि तौफिक  सय्यद, पोहवा बाबा गर्जे, सुनिल शिंदे, चेतन सावंत, भास्कर तारळकर, दिपक मोहिते,संदीप मासाळ, अमोल साकोरे, नापोशि विश्वास नाणेकर, कबीर पिंजारी, राठोड,पोशि संतोष सपकाळ, गौतम सातपुते, पोशि नाईक यांनी यशस्वी रित्या पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!