हिंजवडी पोलिसांनी पकडला अवैध गांज्याचा साठा,दोन आरोपी अटकेत….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

हिंजवडी(पिंपरी-चिंचवड) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड हददीत चालणारे अवैध धंदे विरुध्द कारवाई करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे  पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांचे आदेश असल्याने त्या अनुषंगाने हिंजवडी पोलिस स्टेशन कडील अवैध धंदे विरोधी पथकाचे पोलिस अधिकारी व अमंलदार हे पोलिस स्टेशन हददीत चालणारे अवैध धंद्याची माहीती घेत पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार  रवी पवार यांना बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, वाकडकर वस्ती येथे एक इसम त्याचे जवळ पांढ-या रंगाचे टेम्पो क्रमांक एम. एच १४, एच.यु २५५३ मधुन गांजा घेवुन विक्रीसाठी येणार आहे अशी माहीती मिळाल्याने त्याबाबत खात्री झाल्याने मिळालेली बातमी सपो निरीक्षक खटाळ यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोळ  हिंजवडी पोलिस स्टेशन पिंपरी- चिंचवड यांना कळवीली त्यांनी मार्गदर्शन करुन पुढिल कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सहा. पोलिस निरीक्षक खटाळ व पोलिस स्टाफ असे छापा करवाईचे
साहीत्य व दोन पंचासह मिळालेले बातमी प्रमाणे ठिकाणा जवळ जाऊन थांबुन ट्रॅप लावला असता वाकडवस्ती, वाकड ब्रिज कडुन भुमकर चौकाकडे जाणारे रस्त्याने एक पांढ-या रंगाचा पिक अप हा रस्त्याने जात असताना टेंम्पो चालकास थांबुन त्यातील चालक यास गाडीतुन खाली उतरवुन चौकशी केली असता त्याने गाडीत भाजीपाल्याचा कचरा आहे असे खोटे सांगु लागला पोलिसांना संशय आल्याने गाडीत पाठीमागील भागात असलेल्या पांढ-या रंगाच्या पिशवींची झडती घेतली असता गाडीतील पांढ-या रंगाचे नॉयलॉनच्या पिशवीमध्ये ब्राऊन रंगाचे चिकट पटटीने गुंडाळलेले एकुण १७ पुडे मिळुन आले ते पुडे फोडुन पाहीले असता त्यामधे सुमारे ३१ किलो १०० ग्रॅम गांजा मिळुन आला टेम्पो चालकाचे ताब्यातुन टेम्पो व गांजासह एकुन १४,३८,०००/- रुपये चा मुद्येमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द व गांजा मालक याचे विरुध्द एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ( क ), २० ( ब ) (ii) ( क ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपींची नावे खालीलप्रमाणे.
१) मैनुददीन अब्दुल सत्तार, वय – २३ वर्षे, मुळ रा- गील्हाबारी, वार्ड नंबर ३ थाना जियापोखर,ठाकुरगंज,जिआपोखर किशनगंज, बिहारहल्ली मुक्काम शंकर यांचे पत्राचे रुम मध्ये एक्युअर कंपणी जवळ, फेज २ हिंजवडी, पुणे.
२)बिपलभ बिधन राणा व.व.२४, रा- एमक्युर कंपणी जवळ पत्राचे रुममध्ये फेज २ हिंजवडी, पुणे.
सदरची कारवाई  विनयकुमार चौबे , पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड, ,संजय शिंदे सह पोलिस आयुक्त वसंत परदेशी अप्पर पोलिस आयुक्त, काकासाहेब डोळे पोलिस उप आयुक्त परि. २,
विशाल हिरे ,सहा. पोलिस आयुक्त, वाकड विभाग वाकड यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  श्रीराम पोळ, सुनिल दहिफळे पोलिस निरीक्षक सोन्याबापु देशमुख पोलिस निरीक्षक, अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सहा. पोलिस उपनिरीक्षक महेश वायबसे, पोहेकॉ  संतोष डामसे, पोलिस अमंलदार रवी पवार यांनी केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!