धक्कादायक- पुणे येथील प्रेमीयुगुलाची लॅाजवर गळफास घेऊन आत्महत्या….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे – येथील एका लॉजवर प्रेमीयुगुलाने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आलीय. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घडना उघडकीस आली. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील २० वर्षीय मुलीचे मूळचा अहमदनगरच्या असलेल्या २१ वर्षी मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लॉजवर आले होते. सायंकाळी सहा वाजता ते खोली सोडणार होते. मात्र वेळ
झाल्यानंतरही ते बाहेर न आल्याने लॉजमधील कामगारांनी तरुणाच्या मोबाईलवर संपर्क साधला. तरुणाने फोन न उचलल्याने कामगार खोलीजवळ गेले. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा दरवाजा बंद नसल्याचं लक्षात आलं. दरवाजा ढकलल्यानंतर आत
दोघांनीही गळफास घेतल्याचं दिसलं. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच याची माहिती पोलिसांना दिली.
तरुणी डीएमएलटीचं शिक्षण घेत होती. तर तरुण खासगी कंपनीत नोकरी करत होता. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. अधिक तपास लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज
राजगुरू करत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!