पोलिसांची अशीही तत्परता रिक्षात विसरलेली बॅग काही वेळातच दिली शोधुन,फरासखाना पोलिसांचे कौतुक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे – पोलिसांची माणुसकीचे तसेच ईमानदारीचे बरेच किस्से आपण एकतो याचाच प्रत्यय आज प्रत्यक्षात पाहायला मिळाला
पोलिसांची  कार्यतत्परता  काय असते ते बघाच सागर नावाचे ग्रुहस्त दिवाळीनिमित्त खरेदी केलेल्या कपड्यांची बॅग ते रिक्षातच विसरले. फरासखाना पोलिसांनी वेळ न दवडता रिक्षाचा क्रमांक शोधून, रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सोमवारी संबंधित नागरिकांना परत केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे बनकर कुटूंब
भारावून गेले. यंदा दिवाळीपूर्वीच दिवाळी ‘गोड’ झाल्याची भावना बनकर कुटूंबाने व्यक्त केली.

ही  घटना रविवारी (दि. २९) सायंकाळी चारच्या सुमारास फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सागर मच्छिंद्र बनकर (रा. वाघोली) हे रविवारी कुटुंबासह पुण्यात दिवाळीची खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी मुलचंद मिल येथून कपडे खरेदी केले.त्यानंतर दत्त मंदिर येथून रिक्षात बसून कुंभारवाडा चौक येथे उतरले. रिक्षातून उतरत असताना खरेदी केलेल्या सुमारे ९,२३८ रुपये किंमतीच्या साड्यांची बॅग रिक्षातच विसरले बॅग रिक्षात
विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेत कपड्यांची बॅग रिक्षात विसरल्याची तक्रार दिली.





फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर व तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस
अंमलदार संदीप कांबळे यांनी दत्त मंदिर चौक ते कुंभार वेस चौक यादरम्यान असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले.  पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून रिक्षाचा क्रमांक ट्रेस करुन रिक्षा चालकाला शोधून काढले. पोलिसांनी रिक्षात विसरलेली कपड्यांची
बॅग सागर बनकर यांना परत केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!