बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत दारुगोळा बाळगणार्याच्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने छापा टाकुन आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुणे ग्रामीण – अवैध अग्निशस्त्र बाळगल्याने खुन खुनाचा प्रयत्न खंडणी मागणे दहशत माजविणे अशा गुन्हयांना वाव मिळतो, ही बाब लक्षात घेवून  पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे विक्री करणारे यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्था. गु. शा. चे तपास पथकाला मार्गदर्शन करून योग्य त्या सुचना देवून अवैध अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने आपआपले गोपनीय बातमीदार सतर्क करण्यास सुरूवात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक पौड पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पिरंगुट परीसरात असताना तपास पथकातील पोलिस नायक तुषार भोईटे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी
मिळाली की, वातुंडे परीसरात बस स्टॉप जवळ दोन इसम उभे असून त्यांचे जवळ गावठी पिस्टल व काडतूसे आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरीष्ठ अधिकारी यांचे मागदर्शन व कारवाईचे आदेश प्राप्त करून घेवून दि १८/०९/२०२३ रोजी वातुंडे ता. मुळशी जि पुणे गावचे हद्दीतील टेमघर धरणाकडे जाणारे रोडवरील वातुंडे बस स्टॉप येथे अचानक छापा कारवाई करून तपास पथकाने
इसम

१) सागर मल्लेश व्हंदमुळे, वय २५ वर्षे, सध्या रा. वातुंडे ता मुळशी जि पुणे मुळ रा भोतेवस्ती, सुसगाव ता मुळशी जि पुणे





२) निलेश अशोक चौगुले वय २६ वर्षे, रा. सुसगाव, टकसेन वस्ती, गणपती मंदिराजवळ ता मुळशी जि पुणे



यांची अंगझडती घेतली असता, प्रत्येकी दोन असे एकूण चार गावठी पिस्टल, आठ जिवंत काडतूस, मोबाईल असा एकूण २ लाख १४ हजार रूपये किंचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. सदर प्रकरणी पौड पोलिस स्टेशन येथे दोन्ही इसमांवर गुन्हा नोंदविण्यात  आला असुन एवढया मोठया प्रमाणात अग्निशस्त्राचा साठा मिळुन आल्याने केलेल्या कारवाई बाबत वातुंडे व परीसरातील जनतेने पुणे ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले असून इतर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. अशाच प्रकारच्या कारवाया यापुढे देखील चालू राहणार असून व गुन्हेगारांवर प्रचलीत कायदया अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक  अंकित गोयल , पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे ,पुणे विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश
शिळीमकर, सपोनि नेताजी गंधारे, सफौ हनुमंत पासलकर, पोहवा सचिन घाडगे, राहुल घुबे, अतुल डेरे राजु मोमीण, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, महेश बनकर, जनार्दन शेळके, तुषार भोईटे, चासफौ मुकुंद कदम यांनी यांनी केली असून पुढील तपास पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  मनोज यादव व पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव हे करत आहेत. मा न्यायालयाने आरोपींची  दि २१/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!