वडगाव मावळ हद्दीत मटका अड्ड्यावर SDPO लोणावळा यांचे पथकाचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तीक यांचे वडगाव मावळ हद्दीत कान्हे फाटा येथील वरली मटका अड्ड्यावर धाड, सात आरोपींसह एक लाखांचा मुद्देमाल केला जप्त…..

लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की , वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू आहे. त्यावरून सहा.पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी  दिनांक 07/06/2024 रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता कान्हे फाटा रेल्वे स्टेशन जवळ, आबा सातकर यांचे चाळीतील खोलीसमोरील मोकळ्या जागेत पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये  १) काळूराम पांडुरंग लालगुडे, वय ३१ वर्ष, रा.कुसगाव, ता. मावळ,जि पुणे , २) कृष्णा धारोबा जाधव, वय २४ वर्ष रा. कान्हे फाटा,तालुका मावळ जिल्हा पुणे ३) किसन जवेरी कोळी, वय ६५ वर्ष, रा कान्हे फाटा, ता.मावळ जि.पुणे, ४) विलास सोपान बोरडे, वय ५८ वर्ष, रा. कान्हे फाटा, ता.मावळ, जि पुणे, ५) किरण विजय यादव, वय ३२ वर्ष, रा.कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे,६) राकेश जेकुप्रसाद यादव वय ५८ वर्ष, रा.कान्हे फाटा, मावळ जिल्हा पुणे हे कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आले





त्यांचेकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा मटका अड्डा हा  ७) मदन वाजे, रा.तळेगाव दाभाडे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर इसमांचे ताब्यातून रोख रक्कमेसह एकूण रु.92,890/- एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करत आहेत.



सदरची कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक,पोउपनि शुभम चव्हाण,पो.हवा अंकुश नायकुडे, नितेश (बंटी) कवडे, पोशि गणेश येळवंडे व वडगाव मावळ पो. स्टे कडील पोलिस पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!