सहा.पोलिस अधिक्षक लोणावळा यांची ड्रग पेडलर यांचेवर कडक कार्यवाही..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तीक दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त,चार ड्रग पेडलर यांना घेतले ताब्यात 

लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सहा. पोलिस अधीक्षक,लोणावळा सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर तरुणाई मधे नशाविरोधी जनजाग्रुती करण्यासाठी उपविभागात संकल्प नशा मुक्ती अभियान राबवित असुन त्यानुसार अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे यांचेवर सतत कडक कार्यवाही करण्याचे सत्र सुरु आहे तरीसुध्दा  लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती सत्यासाई कार्तिक यांना मिळाली होती.





त्याअनुषंगाने सत्यासाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत. दि(9) जुन रोजी सत्यसाई कार्तीक यांनी त्यांचे पथकासह टाकलेल्या छाप्यात कामशेत पोलिस स्टेशन हद्दीतील गगन न्यू लाईफ सोसायटी समोर, रमेश शिंदे यांचे चाळीत 1) दिनेश दीपक शिंदे, वय 24 वर्ष, रा. कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे 2) सौरभ राजेश शिनगारे, वय 24 वर्ष, रा कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे एकूण 32 ग्रॅम एमडी पावडर व त्याची पॅकिंग करून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण 3,20,146/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिस शिपाई अमोल ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये कामशेत पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन  पुढील तपास कामशेत पो.स्टे चे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.



तसेच दि(16) जुन रोजी सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 06.20 वाजताचे सुमारास इसम 1)शिवाजी मारुती कडू, वय 35 वर्ष, राहणार कुरवंडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे 2) दिलीप बबन पिंगळे, वय 29 वर्षे, राहणार कुनेगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे हे त्यांचे ताब्यातील मारुती सुझुकी ब्रेझ्झा गाडीतून लोणावळा दिशेकडे जात असताना लोणावळा पोलिस स्चेशन हद्दीत रायगड ते कुरवडे रोडवर, ड्रीमलँड बंगल्यासमोर कार्तिक यांनी पथकासह त्यांना थांबवून, पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे सुमारे 44000/- रू किमतीचे एकूण 04.40 ग्रॅम एम.डी पावडर मिळून आले सदरचे एम.डी पावडर हे चारचाकी गाडीतून विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याने त्यांचेकडून चार चाकी वाहनासह एकूण 8,94,000/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व सदरबाबत पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा पो स्टे येथे एन.डी.पी.एस ॲक्ट, 1985 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा पो.स्टे चे सपोनि लाड हे करत आहेत.



संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या सदरच्या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे 3,60,000/- रू. किमतीच्या एकूण 36.60 ग्रॅम एम.डी पावडरसह रू.12,14,146/- रु कि मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दोन्ही गुन्ह्यांमध्ये सखोल तपास सुरु आहे.

सदरची कारवाई  पोलिस अधिक्षक  पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,लोणावळा सत्यसाई कार्तिक, पोउपनि शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, नापोशि दत्ता शिंदे,पोशि गणेश येळवंडे,सुभाष शिंदे,अमोल ननवरे, अंकुश पवार,गणेश ठाकूर, प्रतीक काळे ,महेश थोरात,सौरभ साबळे, यश माळवे यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!