सासवड हद्दीत अफुची लागवड करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सासवड हद्दीतील शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड करणाऱ्या कोडीत येथील दोन ईसमांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

पुणे(ग्रामीन प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अंमली पदार्थ (अफु) वनस्पतींची बेकायदेशीर लागवड करून त्याचे उत्पादन घेवून विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत.
पुणे ग्रामीण जिल्हयाचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक,पंकज देशमुख  यांनी पदभार स्विकारल्यापासून अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री,सेवन करणारे इसमांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना केले होते.





त्याअनुषंगाने दि.(२४) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कोडीत ता. पुरंदर जि पुणे गावातील दोन इसम  दशरथ बडधे व तान्हाजी बडधे यांनी त्यांचे शेतात विनापरवाना बेकायदेशीरपणे अफुची लागवड करून उत्पादन घेतले आहे. अशी
बातमी मिळाली होती. सदर बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सासवड व राजगड पोलिस स्टेशनकडील पोलिस अधिकारी व स्टाफचे मदतीने वरीष्ठ अधिकारी यांचे आदेश व परवानगीने राजपत्रीत अधिकरी व पंचांसह जावून मौजे कोडीत बुा गावातील मलाईवस्ती येथे गेले. मलाईवस्ती लगतच्या दोन
वेगवेगळया शेतात जावून पाहणी करून कारवाई केली असता, शेतामध्ये उपस्थित इसम दशरथ सिताराम बडधे वय ६५ वर्षे, व तान्हाजी निवृत्ती बडधे वय ६९ वर्षे, दोघे रा. कोडीत बु ता. पुरंदर, जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले, एकूण १० किलो ५०० ग्रॅम वजनाची अफुची ओली बोंडे किं.रू २१,०००/- ची जप्त करण्यात आलेली आहेत. अफुची लागवड केलेली दिसून येवू नये याकरीता शेतात कांदा व शेवंती फुलांची लागवड करण्यात आलेली होती.



सदर दोन्ही इसमांविरोधात सासवड पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ७६ / २०२४ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ब, ८क,१७ क, २९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि बाजीराव ढेकले, सासवड पोलिस स्टेशन हे करत असून गुन्हयातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,पुणे ग्रामीण, मा. अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग,उपविभागीय पोलिस अधिकारी  श्रीकांत पांडुळे, भोर विभाग, सासवड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलिस स्टेशनचे पो.नि. राजेश गवळी, स्था.गु.शा. चे सपोनि राहुल गावडे, पोलिस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडु विरकर, सासवड पो स्टे कडील पोलीस अंमलदार सुरज नांगरे,
जब्बार सय्यद, प्रतिक धिवार, मपोना करंडे, मपोना भुजबळ यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!