सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन राबविण्यात आली दहीहांडी संकल्प नशामुक्तीची..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

लोनावळा-पोलिस अधिक्षक  अंकित गोयल,सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या ‘संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातुन लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मावळ वार्ता फाऊंडेशन यांनी आयोजीत केलेल्या दहिहंडी उत्सवात जमलेल्या सुमारे ५००० जन समुदाया समोर ‘स्वतंत्र थिअटर ग्रुप’ यांनी संकल्पनशा मुक्ती या पथनाट्याचे सादरीकरण करुन तरुण युवकांना सर्व प्रकारच्या नशे पासुन मुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला तसेच सत्यसाई कार्तिक यांनी जमलेल्या समुदायाला उद्देशुन केलेल्या भाषणात नशे पासुन मुक्त राहण्याचा मंत्र दिला तसेच नशा
मुक्तीची शपथ दिली. यावेळी लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सिताराम डुबल लोणावळा शहर पोलिस स्टाफ तसेच मावळ वार्ता फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व जनसुमदाय उपस्थित होता.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!