सहा. पोलिस अधिक्षक यांनी टाकलेल्या छाप्यात १० जुगारीं व MD पावडरसह ७५ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तीक यांची आणखी एक धडाकेबाज कारवाई; ७५ लाखाचे मुद्देमालासह १० जुगारींना घेतले ताब्यात,त्यातील एकाचे ताब्यात सापडले 20 हजारांचे एम.डी. पावडर…..

लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाहीचा सपाटा लावला असुन सततच्या होणार्या कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे त्यातच दिवसेगणिक कार्यवाही सुरु असतांना दि(12)ॲागस्ट 2024 रोजी सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत  बातमी मिळाली  की, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे.





त्यावरून मिळालेल्या माहीतीची शहानिशा करुन सहा.पोलिस अधिक्षक सत्यासाई कार्तीक यांनी  रात्री त्यांचे पथकासह सापळा रचुन मौजे वेहेरगाव येथील मडवी यांचे बंगल्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये 1) राहुल भरत इंगुळकर, वय 34 वर्शे, रा. वाकसई ग्रामपंचायत शेजारी ता. मावळ जि.पुणे 2) संतोष ज्ञानदेव बोत्रे वय 36 वर्षों रा. वेहेरगांव ता. मावळ जि पुणे 3) मंगेश विठ्ठल देशमुख वय 46 वर्शे रा. वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे. 4) संजय विठ्ठल देशमुख वय 43 वर्षों रा. वेहेरगांव ता मावळ जि. पुणे. 5) दिनेश पांडूरंग गायकवाड वय 40 वर्शे रा. वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे 6) चंद्रकांत हौजी देवकर वय 42 वर्षों रा. वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे. 7) विनोद शरद नाणेकर वय 42 वर्षों रा. बेहेरगांव ता. मावळ जि. पुणे. 8) अजित सुनिल देवकर वय 29 वर्षों रा. वेहेरगांव ता. मावळा जि. पुणे. 9) मंगेश मारुती राणे वय 40 वर्षों रा. कामशेत शिवाजी चौक ता मावळ जि. पुणे 10) संतोष काशिराम दळवी वय 45 वर्षों रा. बेहेरगांव ता. मावळ जि. पुणे हे पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना मिळून आले.



तसेच पोलिसांनी वर नमूद आरोपींची झडती घेतली असता संतोष काशिराम दळवी खूय 45 वर्ष, रा बेहेरगांव ता. मावळ जि पुणे याने स्वतःचे पॅन्टचे खिशामध्ये 2.030 ग्रॅम कि. वजनाचे व रु.20,300/- एवढ्या किमतीचे एम.डी पावडर हा अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगल्याचे मिळुन आले आहे. सदरच्या कारवाईमध्ये वर नमुद सर्व आरोपींचे ताब्यातुन रोख रक्कम, वाहने व इतर साधने असा एकूण रु 74,14,050/- एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर बाबत पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गु.र.न.249/2024 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 5. एन.डी.पी.एस. 1985 चे कलम 8 (क) 21 (ब)  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.



सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली  सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी लोणावळा  सत्यसाई कार्तिक, सपोनि शेवते,पोउपनि शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे पोशि सुभाष शिंदे, गणेश येळवंडे, मंगेश मारकड यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!