
लोणावळा उपविभागात राबविलेल्या संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत वडगाव-मावळ पोलिसांनी जप्त केला ७ किलो गांजा…
संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत वडगाव मावळ पोलिसांकडुन 1,08,640/ रुपये किमतीचे मुद्देमालासह 6 किलो 876 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त, 2 आरोपींना अटक….
लोणावळा (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन लोणावळा विभागामध्ये “संकल्प नशामुक्ती अभियान राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगानेच आज रोजी वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार त्यांनी वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे पथकासह मौजै टाकवे
गावचे हद्दीत आरोपी 1) पोपट विठोबा जांभुळकर 2) सोमनाथ पोपट जांभुळकर दोन्ही रा. टाकवे बु ता. मावळ. जि. पुणे. यांचे घरावर छापा मारुन त्याठिकाणाहुन आरोपी यांचेकडुन 1,08,640/- रुपये किमतीचे मुद्देमालासह 6 किलो 876 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करुन 2 आरोपी यांना ताब्यात घेवुन अटक केलेले आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुमार कदम, मपोउपनि ऋतुजा मोहिते, पोहवा
गायकवाड, कसेबकर, सुपे, होले, नापोशि तावरे,पोशि/कुंभार, पतुरे, यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास मपोउपनिरीक्षक ऋतुजा
मोहिते ह्या करत आहेत.
पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले कि, यापुढेही “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई चालु ठेवणार आहोत.




