भारताचे महामहीम राष्ट्रपती यांचे लोणावळा दौऱ्याच्या अनुषंगाने वाहतुक व्यवस्थेत केलेले बदल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

लोणावळा – (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२९/११/२०२३ रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रोपती मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्र येथे भेट देवुन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न करणार आहेत. मा.राष्ट्रपती महोदयांच्या या    दौ-याच्या निमित्ताने प्रशासन  सज्ज झाले असुन, पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
मा राष्ट्रपती महोदया आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र येथे नियोजित कार्यक्रमासाठी जाणार असुन, सुरक्षेच्या उपायोजना म्हणून पोलीस प्रशासनाकडून आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम या मार्गावरील वाहतूक मा. राष्ट्रपती महोदया यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील वाहतुकीमध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३६ अन्वये बंदोबस्ताचे मुख्यमार्गावरील वाहतूक दि. २९/११/२०२३ रोजी दुपारी ०२:०० वा ते सायंकाळी ०५:०० वा यावेळेत अंशतः निर्बंध घालण्यात येत आहे. सदर बाबत.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३६ अन्वये आदेश पारीत करण्यात आले आहे. तसेच नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

यादरम्यान पर्यायी मार्ग – 
→ पुणे बाजुकडून एक्सप्रेस वे वरुन येणारी वाहने ही लोणावळा येथे न येता एक्सप्रेस वे ने मुंबई कडे जातील तसेच पुणे कडून जुन्या हायवे ने येणारी वाहने ही कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस वे ने
मुंबई बाजुकडे जातील.





→ मुंबई बाजुकडून एक्सप्रेस वे ने येणारी वाहतूक ही खंडाळा एक्झीट येथून खाली न उतरता पुणे बाजुकडे सरळ जातील. तसेच लोणावळा एक्झीट ने खाली येवून पुणे बाजुकडे जातील.



लोणावळा शहरवासी यांचे करीता सुचना —



@ वाहन धारकांनी सदर वेळेत आपली वाहने शक्यतो आणू नये.
@ ड्रोन, पॅराग्लायडींग तसेच एअर बलून असे लोणावळा शहर व परीसरात उड्डानास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!