शिक्रापुर पोलिसांनी उघड केले घरफोडीचे ४ गुन्हे,मुद्देमालासह ३ आरोपी अटकेत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

शिक्रापुर(पुणे ग्रामीण) –  सवीस्तर व्रुत्त याप्रमाणे की पोलिस स्टेशन शिक्रापुर येथे गुन्हा भादवि कलम ४५७,३८०,४९९ दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी

संतोष मुंजाजी शहाणे, वय ४९ वर्षे, रा. जातेगाव रोड, शिकापुर, ता. शिरूर, जि. पुणे





यांचे शिकापुर गावातील श्री विनायक ज्वेलर्स या दुकानामध्ये दि.१८/१०/२०२३ रोजी रात्री ०२.३० ते ०३.३० वाजणेचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करून १,२३,८००/- रू. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन प्रमोद क्षिरसागर, पोलिस निरीक्षक, शिकापुर पोलिस स्टेशन यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणन्यासाठी गुन्हे शोध पथकास सुचना व मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे शिकापुर पोलिस स्टेशनचे  प्रमोद क्षिरसागर, पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनान्वये गुन्हे शोध पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांनी गुन्हयाचा तांत्रीक, गुप्त बातमीदार, सी.सी.टी.व्ही फुटेज इ. पध्दतीने तपास केला असता, सदरचा गुन्हा हा मोशी येथे राहणाऱ्या ३ इसमांनी केला असल्याची खात्री पोलीसांनी झाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी आरोपींचा
मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता सदर आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवली व गुन्हयातील निष्पन्न आरोपी



१ ) गजेंद्र उत्तम जाटव, वय २२ वर्षे, रा. वासुलीफाटा, चाकण रोड, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. कारोठा, ता. करेरा, जि.शिवपुरी, मध्यप्रदेश,



२) ब्रिजेन बाबुलाल रावत, वय २४ वर्षे, रा. मोशी, पोलीस चौकी जवळ, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. करही ता नरबर, जि. शिवपुरी,
मध्यप्रदेश,

३) किष्णकांत प्रदिप झा, वय २५ वर्षे, रा. मोशी, पोलीस चौकी जवळ, ता.हवेली, जि.पुणे. मुळ रा. करही ता नरबर, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश

यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे मालमत्तेच्या गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता, आरोपी क्रमांक २ व ३ यांनी गेल्या ३ महीन्याच्या कालावधीत शिकापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीचे एकुण ४ गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. नमुद आरोपींनी कबुली दिल्याप्रमाणे ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आहे.
नमुद आरोपींना शिकापुर पोलिस स्टेशन गु.र.नं. १०१४/२०२३ भा.द.वि.सं.कलम ४५७, ३८०, ४११, ३४ या गुन्हयामध्ये अटक करण्यात आले असुन त्यांचेकडुन १,६४,८००/- रू. किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व १०,०००/- रू.किंमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल असे एकुण १,७४,८०० /- रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास  प्रमोद क्षिरसागर, पोलिस निरीक्षक यांचे मार्गदशनाखाली पो.हवा.  श्रीमंत होनमाने हे करीत आहेत.
अटक आरोपीकडुन शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेले ४  गुन्हे निष्पन्न करण्यात आले.

सदरची कामगिरी ही अंकित गोयल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण,
मितेश घट्टे, अपर पोलिस अधीक्षक पुणे, यशवंत गवारी,उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षिरसागर पोलिस निरीक्षक,  केशव वाबळे, सहा. पोलिस निरीक्षक,  नितीन अतकरे सहा पोलिस निरीक्षक यांचेसह सफौ  जितेंद्र पानसरे, पोहवा श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, पोना  विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, पो.कॉ. जयराज देवकर, निखील रावडे व किशोर शिवणकर यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!