वार्षिक निरीक्षणाचे अनुषंगाने विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पोलिस मुख्यालयाला भेट…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वार्षीक निरीक्षणाचे अनुषंगाने सुनिल फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक,कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची पुणे ग्रामीण पोलीस  मुख्यालयास भेट….

पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांचे पुणे ग्रामीण पोलिस  मुख्यालयाचा वार्षीक निरीक्षणाचा नियोजीत कार्यक्रम पारपडला त्यात दिनांक ०३.०४.२०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजता वार्षिक निरीक्षण अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय येथे समारंभीय कवायत आयोजीत करण्यात आली होती. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक,कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांना पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामिण यांनी मानवंदना दिली, विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी समारंभीय कवायतीचे निरीक्षण केले व रमेश चोपडे, अपर पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी कवायतीचे नेतृत्व केले. त्यानंतर पी. टी क्लास,लाठी ड्रिल, गार्ड ड्रिल, बि.डि.डि.एस पथकाचे प्रात्यक्षिक, आगामी काळात येणारे महत्वाचे बंदोबस्त यांचे दृष्टीकोनातून मॉब डिसपर्सल प्रात्यक्षिकाचे निरीक्षण केले.
तदनंतर ११.३० वाजता पुणे ग्रामीण येथील भिमाशंकर हॉल मध्ये दरबार घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलिस अधकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी व वर्ग ४ कर्मचारी यांचे अडचणी दरबार मध्ये जाणुन घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
दरबार संपन्न झालेनंतर  विशेष पोलिस महानिरीक्षक. यांनी गुन्हा बैठक घेतली. सदर बैठकीत पुणे ग्रामीण दलातील उपविभागीय पोलिस अधीकारी, प्रभारी अधीकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे कडुन जिल्हूयातील गुन्हयांचा आढावा घेतला व गुन्हयाचे प्रमाण रोखण्याकरीता  कराव्या लागणाऱ्या उपायोजना, गुन्हेगारांना आळा घालणे, गुन्हा उकल, दोषसिध्दी, एन.डी.पी.एस गुन्हे, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त व सार्वत्रीक लोकसभा निवडणुक बंदोबस्त तयारी बाबत मार्गदर्शन केले. बैठकीत जिल्ह्यातील पोलिस
अधिकारी व अंमलदार यांचे मानोबल वाढावे या दृष्टीने उत्कृष्ट तपास करणारे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात आला.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!