स्थानबध्द व फरार आरोपी तात्या घोडके यास शस्त्र साठ्यासह पुणे ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद…
स्थानबध्द व फरार सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या घोडके यास सशस्त्र साठयासह वालचंदनगर पोलीसानी केले जेरबंद….
वालचंदनगर(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, वालचंदनगर पोलिस स्टेशन हददीतील सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या घोडके याचेवर नातेपुते, सातारा शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर व वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने मारहाण, सरकारी नोकर यांना मारहाण करणे, बेकायदेशिरित्या अग्निशस्त्रे बाळगणे व अवैध वाळु चोरीचे असे एकुण ९ गुन्हे दाखल असुन तो वालचंदनगर हद्दीत दहशत माजवुन वर्चस्व निर्माण करण्यासारखी कृत्य करत असल्याने त्याचेविरुदध वालचंदनगर पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी विक्रम साळुखे यांनी त्याचेवर एम पी डी ए अंतर्गत स्थानबध्द करणेकामी पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारीपुणे यांना प्रस्ताव पाठविला होता.
सदर प्रस्तावावर मा. जिल्हाधिकरी सो यांनी आदेश कं पगम / एम.पी.डी.ए /एस.आर. /०६/०१/२०२४दि.३.९.२०२४ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहे. तसेच सदर आरोपी हा वालचंदनगर पोलिस स्टेशन गुरन २४६/२४ कलम ३७९ व सहकलम गौण खनिज अधिनीयम कलम २१ (४) प्रमाणे दाखल गुन्हयात फरार असल्याने आम्ही सदर आरोपीचा शोध घेत असताना पोहवा शैलेश स्वामी, पोहवा गणेश काटकर, यांना सराईत पाहिजे असलेला फरारी गुन्हेगार सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके हा वालचंदनगर येथील कामगार वसाहत पोस्ट कॉलनी येथील घरात बाहेरून कूलूप लावुन लपुन बसला असल्याची गोपनिय खात्रीशीर माहिती मिळाल्याने सपोनि राजकुमार डुणगे पोलिस स्फाटसह सदर ठिकाणी रवाना होवुन वालचंदनगर येथील कामगार वसाहतीत त्याचे जुने घरी पाठीमागुन प्रवेश करून त्यास ताब्यात घेवुन दोन पंचासमक्ष घराची झडती घेतली असता खालीलप्रमाणे अवैध शस्त्रसाठा मिळुन आला आहे.१) ०३ गावठी पिस्टल मॅगझीनसह २) ०१ खाली मॅगझीन ३) १० जिवंत काडतुसे ४) ०९ गावठी सुतळी बॉम्ब ५) ०१ लोखंडी पालघन मुठ असलेली ६) ०१ मुठ नसलेले तलवारीचे धारदार पाते ७) ०२ लोखंडी धारदार चाकु ८) ०२ लोखंडी धारदार कटर ९) १४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल
असा वरील बेकायदशिर शस्त्रसाठा दोन पंचासमक्ष जप्त करून मिळून आलेल्या गावठी पिस्टल व गावठी सुतळी बॉम्ब बाबत आरोपी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके याचेकडे विचारपुस केले असता त्याने त्याचे व त्याचे साथीदाराचे असल्याचे सांगितले आहे.आरोपी सुयश उर्फ तात्या घोडके याचेकडे अवैध शस्त्रसाठा मिळुन आल्याने पोहवा शैलेश स्वामी यांचे फिर्यादीवरुन वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे गुरन ३३१/२४ कलम २८८ बीएनएस सहकलम ३,४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम सहकलम ४ स्फोटक अधिनियम १९०४ सहकलम ३७ (१) (३) / १३५ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीने सदरचे हत्यार कोठुन आणि कोणाकडुन आणली आहे याबाबत सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि राजकुमार डुणगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख,अपर पोलिस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिरादार ,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि राजकुमार डुणगे, पो. हवा शैलेश स्वामी, पो हवा. गणेश काटकर, पो हवा प्रमोद बनसोडे, पोशि अभिजीत कळसकर,अमोल चितकोटे, राम आढाव, महिला पोशि निता किर्दक,प्रमोद टापसे, अमोल सोनवणे,महेश चोपणे यांनी पार पाडली आहे