कोलाड पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या मोबाईल दुकान चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने केली मुद्देमालासह अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कोलाड(रायगड) – सवीस्तर व्रुत्त असे की  कोलाड पोलिस ठाणे गु.र.नं. 60/2023 भा.द.वि.कलम 380, 454, 457 व 76/2023
भा.द.वि.कलम 379 अन्वये गुन्हे दाखल असून कोलाड नाका येथे न्यू टाइम सेन्टर मोबाईल शॉपी या दुकानातुन तसेच स्मार्ट फोटो स्टुडिओ आणि मोबाईल शॉप या दुकानातून मोबाईल चोरी बाबत सदर गुन्हे अज्ञात आरोपी विरोधात दाखल आहेत.
सदर दोन्ही गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. सदर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून

डेव्हिड कलेश्वर मिंज, 26 वर्षे, रा.पुईगाव, कोलाड, जि.रायगड





यास सदर गुन्ह्याकामी ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने नमूद दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीताकडून वरील दोन्ही गुन्ह्यात चोरी गेलेले विविध कंपनीचे एकूण 29 मोबाईल, 2 लॅपटॉप व एक स्पीकर तसेच सदर गुन्हे करताना वापरलेली मोटारसायकल असा एकूण 3,19,000/-
रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीस पुढील कारवाई करीता कोलाड पोलुस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी .सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक रायगड,  अतुल झेंडे, अपर पोलिस अधीक्षक रायगड, स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलिस निरीक्षक  बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोहवा  जितेंद्र चव्हाण, पोना विशाल आवळे, पोशि अक्षय सावंत, मपोशि जयश्री पळसकर, सायबर शाखेचे पोना तुषार घरत, पोशि अक्षय पाटील यांनी  केलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!