नेरळ पोलिसांनी ६ तासाचे आत उघड केला घरफोडीचा गुन्हा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नेरळ पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना मुद्देमालासह 6 तासांच्या आत केली अटक…

रायगड (प्रतिनिधी)- नेरळ पोलीसांनी जलदगतीने तपास तपास करत 6 तासांच्या आत घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चिल्लर रक्कम असा एकूण 3,27, 365/- रु. ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी महेंद्र हरिशंकर दुबे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्या वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.10 जानेवारी) रोजी रात्री 10.00 ते (दि.11जानेवारी) रोजी 08.00 वा.च्या दरम्यान मौजे नेरळ खांडा येथील महेंद्र हरिशंकर दुबे यांच्या बंद घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरटयांनी तोडून घरातील 3,25,350/- रूपये किंमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व 2,015/- रूपयांची चिल्लर रक्कम असे एकुण 3,27,365/- रू. किंमतीचे ऐवज घरफोडी चोरी करून चोरून नेलेबाबत महेंद्र हरिशंकर दुबे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने त्याप्रमाणे नेरळ गुन्हा रजि. नं.05/2024 भादंविसं कलम 454,457,380 प्रमाणे (दि.12 जानेवारी) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.



सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी नेरळ पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि/ढवळे यांनी तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक/नितीन मंडलिक, पोलिस उपनिरीक्षक/लिंगप्पा सरगर, सहा. फौजदार/श्रीरंग किसवे, पोहवा/ नवनाथ म्हात्रे यांना मार्गदर्शन केले असता संबंधीत पथकाने चौकशी चालू केली. फिर्यादी यांचे घराशेजारी राहणारा अविनाश रामसिंग राठोड, (वय-24 वर्षे), रा.नेरळ खांडा याच्या संशयीत हालचाली होत असताना पोलिसांना दिसून आल्याने त्यास नेरळ पोलिस ठाण्यात चौकशीकामी बोलावून त्याचेकडे पोलिसांनी कसून विचारपूस केली असता त्याने व त्याचेसोबत त्याचा साथीदार अयाउद्दीन निजामुद्दीन शेख, (वय-21 वर्षे), रा.अमन कॉम्प्लेक्स, नेरळ, खांडा, ता. कर्जत, जि. रायगड यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्हा दाखल झाल्या नंतर 6 तासांच्या आत पोलीसांनी (दि.12जानेवारी) रोजी अटक करून गुन्हयात चोरलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने व चिल्लर रक्कम असे एकुण 3,27,365/- रूपयांचे ऐवज हस्तगत करण्यात पोलीसांना यश आलेले आहे.



अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून गुन्हा उघडकीस आणणेकामी नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक/शिवाजी ढवळे, पोलिस उपनिरीक्षक/नितीन मंडलिक, पोलिस उपनिरीक्षक/लिंगप्पा सरगर, सहा. फौजदार/ श्रीरंग किसवे, नवनाथ म्हात्रे यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!