
स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस ताब्यात घेऊन,३ तोळे केले हस्तगत
घरफोडी सह चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणून ३० ग्रॅम सोने केले हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….
सोलापुर(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वेळापूर पोलिस ठाणे येथे गु र क्र १५१/२५ कलम ३३१(४),३०५ BNS अन्वये गुन्हा नोंद आहे. तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती परंतु सदर गुन्ह्यातील आरोपी करण शरन्यां भोसले वय २९ वर्ष रा मतकरवस्ती कोराळे ता बारामती जिल्हा पुणे याचा सहभाग निष्पन्न झाला होता. परंतु तो फरार होता



त्याअनुषंगाने फरार आरोपीचा शोध सुरु असतांना पोलिस अंमलदार विनायक घोरपडे यांना गोपनीय बातमी मिळाली की सदरचा आरोपी हा मतकरवस्ती कोराळे ता बारामती जिल्हा पुणे येथे आहे त्यानुसार सापळा रचुन त्यास येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने १). वेळापूर पोलिस ठाणे गु र क्र १५१/२५ कलम ३३१(४),३०५ BNS २)वेळापूर पोलिस ठाणे गु र क्र १८१/२५ कलम ३३१(४),३०५ BNS या दोन गुन्ह्यांची कबुली दिली तसेच अधीक तपासादरम्यान त्याच्याकडून ३० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे नमूद आरोपी आणि हस्तगत मुद्देमाल वेळापूर पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण.प्रीतम यावलकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,.संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विजय आत्माराम शिंदे,श्रेणी पोउपनि श्रीकांत विजय गायकवाड,पोहवा रवी सुनील माने,सलीम बागवान
धनराज विलास गायकवाड,पोशि मनोज सुरेश राठोड, सूरज गजेंद्र रामगुडे, विनायक नवनाथ घोरपडे,अन्वर अत्तार,मपोहवा अश्विनी गोटे,मपोशि दीपाली जाधव,सुनंदा झळके,चापोशि सतीश संजय बुरकुल यांनी केली.




