
अट्टल घरफोड्या सम्या सोलापुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…
04 दरोडे व 14 घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी…,
सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोलापुर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे,अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेवून पकडणेकामी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सुचना केल्या होत्या.


त्यानुसार एप्रील 2022 मध्ये मौजे रोपळे ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील फिर्यादीचे राहत्या घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण 5,49,000/- चा मुद्देमाल चोरी करून नेला होता. सदर गुन्हयाचे तपासामध्ये हा गुन्हा आरोपी

समीर उर्फ सम्या रवि चव्हाण हा मौजे कुंभारी ता. दक्षिण सोलापूर

याने केल्याबाबत निष्पन्न झाले होते. सपोनि. शेळके व त्यांचे पथक वळसंग गांवात हजर असताना, त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सदर गुन्हयातील आरोपी नामे समीर उर्फ सम्या रवि चव्हाण हा मौजे कुंभारी ता. दक्षिण सोलापूर हा कुंभारी येथे आला असल्याची बातमी मिळाल्याने सपोनि शशिकांत शेळके यांचे पथक मौजे कुंभारी ता. दक्षिण सोलापूर येथील गांवातील ब्रिज परिसरात जावून सापळा लावून त्यास षिताफीने ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचे नांव व पत्ता विचारले असता तो सुरवातीस खोटे नांव सांगून उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. त्यानंतर त्यास विश्वासात घेवून त्याचे खरे नाव सांगितले आहे. सदर आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता सदरचा आरोपी हा वैराग, टेंभूर्णी, अकलुज पोलिस स्टेशनला दाखल असलेले प्रत्येकी एक प्रमाणे 04 दरोडे गुन्हे, व पंढरपूर, करकंब, बार्शी, वैराग, टेंभूर्णी, मोहोळ इत्यादी पोलीस ठाणेस दाखल असलेल्या 14 घरफोडी चोरीच्या गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी होता. नमूद आरोपी हा गुन्हा केल्यानंतर त्याचे आस्तित्व बदलून तसेच नांव बदलून वेगवेगळया ठिकाणी राहत होता. त्यामुळे पोलिस पथकाला तो मिळून येत नव्हता. नमूद आरोपी यास पंढरपूर तालुका पोलिस ठाणे गुरनं 252/2022 भादवि कलम 457, 380 प्रमाणे या गुन्हयात अटक करण्यात आली असून उघडकीस न आलेले गुन्हे उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सदरची कामगिरी शिरीष सरदेशपांडे पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर अपर पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलिस निरीक्षक
शशिकांत शेळके, सफौ नारायण गोलेकर, पोहवा धनाजी गाडे, मोहन मनसावाले, नापोशि धनराज गायकवाड, पोशि अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख यांनी बजावली आहे.


