संशयावरून दोन अट्टल घरफोड्यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले १० गुन्हे,किंमती मुद्देमालही केला जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दोन संशईत अट्टल घरफोडी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हयातील व यवतमाळ जिल्हयातील घरफोडी, दुकानफोडी व मंदीर चोरीचे एकुण १० गुन्हे केले उघड, आरोपीतांकडुन सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण किं. १५,८८,३९१/- रू. चा मुद्देमाल जप्त….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हयामध्ये व वर्धा जिल्हयालगत असलेल्या जिल्हयांमध्ये वाढत असलेल्या घरफोडी, दुकानफोडी तसेच चोरीच्या गुन्हयाच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विमोद चौधरी यांनी दोन पथके तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या होत्या





त्यानुसार दि १६ जानेवारी रोजी वर्धा शहर परिसरात वारंवार होत असलेल्या चोरी, घरफोडी व दुकान चोरी मधील अज्ञात आरोपी व मुद्देमालाचा शोध संबंधाने सराईत गुन्हेगार चेक व पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे दोन आरोपींना निष्पन्न करुन. १) सुनिल उर्फ रॉकी शांताराम शिंदे, वय २३ वर्षे, रा. गिट्टीखदान बोरगांव मेघे, वर्धा २) चंदु उर्फ चंद्रकांत हिरा बतकल, वय ३६ वर्षे, रा. पंकज टॉकीज चे मागे हनुमान वार्ड, शंकर मंदीर जवळ वरोरा, ता. वरोरा जि. चंद्रपुर, ह.मु. गिट्टीखदान बोरगांव मेघे, वर्धा यांना ताब्यात घेवुन चोरीचे गुन्हयासंबंधाने सखोल विचारपुस केली असता आरोपींनी मागील काही दिवसात त्यांचे कडील काळया रंगाची चारचाकी वाहनाचा वापर करून त्यांचे ईतर साथिदारांच्या मदतीने गुन्हे केल्याचे कबुल केले



त्यांनी सांगीतल्याप्रमाणे वर्धा जिल्हयातील १) पो.स्टे. सेवाग्राम हद्दीतील ०१ घरफोडी व ०१ किराणा दुकान २) पो.स्टे. खरांगणा हद्दीतील आंजी मोठी येथील किराणा दुकान फोडुन चोरी ३) पो. स्टे. देवळी येथील गौळ गावातील खराबे महाराज देवस्थानातील चोरी, ४) पो.स्टे. पुलगांव येथील घरफोडी, ५) पो.स्टे. हिंगणघाट हद्दीत ०१ किराणा दुकान व ०१ घरफोडी चोरी ६) हिंगणघाट येथील रेल्वे हद्दीतील वॅगन फोडुन तांबा चोरी तसेच यवतमाळ जिल्यातील १) पो.स्टे. वणी येथील घरफोडी, २) पो.स्टे. राळेगांव येथील दुकाना फोडुन तांबा चोरी अश्या वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी, दुकान फोडी व मंदिर चोरीचे एकुण १० गुन्हे केल्याची कबुली दिली.



सदर गुन्हयातील चोरलेल्या मुद्देमाला संबंधाने आरोपींची कसुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील पिवळया धातुचे मंगळसुत्र, बांगडया, कानातील बिऱ्या, गळयातील चेन, अंगठी असे पिवळ्या धातुचे १४६ ग्राम वजनाचे दागीने, चांदिचे शिक्के, पैजण ६८ ग्राम वजनाचे दागीने, पांढऱ्या मण्यांची माळ, नगदी ३,९८,०००/- रुपये, ०६ पेन ड्राईव्ह, विविध कंम्पनीचे ३५ सिगारेट पाकिट, बिडी बंडल, तेलाचे कॅन, तुपाचे डब्बे तसेच आरोपींचे ०२ मोबाईल फोन, घरफोडी करण्या करिता वापरण्यात आलेले पेचकस असा एकुण किं. १५,८८,३९१/- रू चा मुद्देमाल आरोपींनी काढुन दिल्याने सदरचा माल गुन्हयाचे पुराव्याकामी आरोपींकडुन जप्त केला असुन सदर आरोपींकडुन अशाच प्रकारचे ईतरही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अक्षय राऊत, म.पो.हवा. अलका कुंबलवार, पो. अंमलदार अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!