
अवैधरित्या देशी विदेशी मोहा दारु विक्रेत्यांवर डीबी पथकाची मोठी कार्यवाही…
पोलिस स्टेशन आर्वी येथील डी बी पथकाने देशी,विदेशी व मोहा दारुची अवैधरित्या छुपी विक्री करणार्यावर छापा टाकुन केली मोठी कार्यवाही….
आर्वी(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अवैध धंदे विरोधात दिलेल्या कडक कार्यवाही करण्याचे आदेशानुसार जिल्हाभर धाडसत्र राबवुन अवैध धंदेविरोधात कडक कार्यवाही होतांना दिसतेय त्या अनुषंगाने दिनांक 29/07/2025 रोजी पोलिस स्टेशन आर्वी येथील डि बी पथक पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की जनता नगर आर्वी येथे राहणारा दिलीप कुसरु ठाकरे, विठ्ठल वार्ड आर्वी येथे राहणारा दर्शनाकौर प्रकाशसिंग बावरी व जोगेंद्रसिंग धरमसिंग बावरी यांनी आपले घरी अवैधरित्या देशी-विदेशी तसेच मोहा दारुचा अवैध साठा किरकोळ विक्रीकरीता साठवुन ठेवलाय



अशा गोपनीय माहीतीवरुन सदर ठिकाणी नमुद ईसमांवर पंच व पोलिस स्टापच्या मदतीने देशी, विदेशी व गावठी मोहा दारु बाबत दारु रेड केला असता नमुद ईसमांचे घरझडती मध्ये लाकडी दिवाणखाली तसेच किचनरुम मधील स्टाईल खाली केलेल्या गड्डा (सुरुंग) मध्ये विदेशी दारुच्या 180 मिलीच्या रॉयल स्टंग कंपनीच्या 5 निपा, आयकॉनिक व्हॉईट कंपनीच्या 11 निपा प्रति निप 350 रुपये प्रमाणे 5,600/- रुपये, 180 मिलीच्या देशी संत्रा बाँबी कंपनीच्या एकुन 202 काचेच्या निपा प्रति निप 200/- प्रमाणे 40,400/- रुपये, 90 मिलीच्या देशी संत्रा बाँबी कंपनीच्या एकुन 162 प्लास्टीक निपा प्रति निप 125/- रुपये प्रमाणे 20,250/-रुपये, दोन रबरी ट्युब, दोन प्लास्टीक डबकी, दोन प्लास्टीक पन्नीमध्ये एकुन 250 लिटर गावठी मोहा दारु प्रति लिटर 200/- रुपये प्रमाणे 50,000/- रुपये असा रबरी ट्युब व प्लास्टीक डबकीसह एकुन किमंत 1,17,250/- रु चा दारु मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष मौका जप्ती पंचनामा कार्यवाही प्रमाणे जप्त करण्यात आलेला असुन नमुद आरोपींविरुध्द पोलिस स्टेशन आर्वी येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयाचे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे, प्रभारी उपविभागिय पोलिस अधिकारी पुडंलिक भटकर यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन आर्वी ठाणेदार पोलिस निरीक्षक सतिश डेहनकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात DB पथकाचे पो.उप.नि. संतोष चव्हाण,पोहवा योगेश चन्ने, अमर हजारे, अंकुश निचत, अमोल गोरटे, सुरज रिठे बालाची मस्के यांनी केली.




